पणजीसाठी एचएमआरएपी योजना

0
368

गोवा खबर:जल हवामानशास्त्रीय धोक्यांपासून शहराची लवचिकता अधिक सुधारण्यासाठी नॅशनल सायक्लोन रिस्क मिटिगेशन प्रोजेक्ट (एनसीआरएमपी),च्या  २र्‍या टप्प्यांतर्गत निवडण्यात आलेल्या सहा किनारी शहरांमध्ये पणजी शहराचा समावेश झाला आहे, असे जलस्रोत खात्यातर्फे कळविण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत ज्या शहरांसाठी हायड्रो-मेटेऑरॉलॉजिकल रेझेलिअंस ऍक्शन प्लॅन (एचएमआरएपी) तयार करण्यात येत आहे, त्यात केरळमधील कोची, कर्नाटकमधील मंगळुरू, महाराष्ट्रातील रत्नागिरी, गुजरातमधील पोरबंदर आणि पश्चिम बंगालमधील बिधाननगर या शहरांचा समावेश आहे.

 पणजी शहराची जल हवामानशास्त्रीय धोक्यांपासूनची लवचिकता सुधारण्यात पणजीच्या शासनकर्त्यांना मदत होण्यासाठी हे एक महत्त्वाचे दस्तऐवज असेल. या प्लॅनमध्ये पणजी शहराच्या काही विशिष्ट बाबी व प्राधान्याने करण्यासारख्या गोष्टींचा समावेश आहे आणि छोट्या, मोठ्या व दीर्घ कालावधीसाठी अंमलबजावणी करण्यात येईल अशा काही महत्त्वाच्या कृती यात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तसेच, गुंतवणुकीचा रचनाबंध विकसित करण्यासाठी या प्लॅनचा आधार घेण्यात येईल.

 हा प्रकल्प एनडीएमएने सुरू केला असून त्यासाठी जागतिक बँकेने निधी पुरविला आहे. कन्सल्टंट्स, रॉयल हॅस्कोनिंग डीएचव्ही यांनी जेव्ही तारू लिडिंग एज यांच्या भागीदारीने विकसित करण्यात येईल. पूर, चक्रीवादळ, भूस्खलन, उष्णतेची लाट, दुष्काळ यासारख्या परिस्थितींपासून शहराची लवचिकता वाढविणे हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे.

 भागधारक सल्लागार प्रक्रियेचा भाग म्हणून, जलस्रोत खात्याच्या सचिवांनी अलीकडेच पर्वरी येथील सिंचय भवन येथे भागधारकांची कार्यशाळा घेतली.

 एचएमआरएपी अंतर्गत माहिती गोळा करणे व इतर कामे पुढील १८ महिने चालेल असे माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.