पणजीवासीयांवर पोटनिवडणूक लादली:गोसुमंचा आरोप

0
925

पणजीच्या विकसात मनोहर पर्रिकर पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.पर्रिकर यांचे आयुष्य सेटिंग करण्यात गेले.त्यामुळे त्यांना पणजीच्या विकसाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही.म्हणूनच त्यांना 365 दिवसांचा नवीन प्लान असल्याचे लोकांना सांगून मते मागावी लागत असल्याचा आरोप गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार आनंद शिरोडकर यांनी पणजी मार्केट बाहेर झालेल्या कोपरा मीटिंग मध्ये केला. पर्रिकर हे कायम फटिंगपणा करत आले असून त्यांनी भाजप पक्ष संपवून स्वतःचे प्रस्थ निर्माण केले आहे.पर्रिकर हे तत्वहीन नेते असून त्यांना घरी बसवण्याची गरज असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.गोवा सुरक्षा मंचच्या कार्यकर्त्यांनी पणजी मार्केट बाहेरच्या परिसराची साफसफाई केली.