पणजीवासियांच्या प्रेमाने भारावून गेलो-चोडणकर

0
1053

मनोहर पर्रिकर यांच्या तुलनेत मी फार छोटा कार्यकर्ता आहे.मात्र पर्रिकर यांच्या कारभाराला कंटाळलेल्या पणजीवासियांनी ज्या पद्धतीने मला समजून घेत प्रतिसाद दिला तो पाहता माझा आत्मविश्वास वाढला आहे.पणजीवासियांनी अंतर्मनाचा आवाज ऐकून मला प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांनी केले.
चोडणकर म्हणाले,पणजी मध्ये प्रचार करताना मला लोकांकडून स्थानिक समस्या कळून आल्या.पर्रिकर यांनी 23 वर्षात पणजीसाठी काहीच केले नाही याचा राग लोकांच्या मनात खदखदत आहे.माझ्या सारख्या सध्या माणसाकडून पणजीवासियांच्या खुप अपेक्षा आहेत.पणजी मध्ये अनेक भागात लोकांना पिण्याचे पुरेसे पाणी मिळत नाही.कचरा आणि पार्किंग समस्या गंभीर बनली आहे.पर्रिकर यांना पणजीवासियांनी नेहमीच साथ दिली मात्र त्यानी पणजीला कॅसिनो शिवाय काहीच दिले नाही असा आरोप करत लोकांचा राग 23 ऑगस्ट रोजी मतपेटी मधून व्यक्त होईल.तो व्यक्त करण्यासाठी माझी मदत लोकांना होईल असा विश्वास चोडणकर यांनी व्यक्त केला.