पणजीवासियांकडून चांगले मताधिक्य मिळेल:पर्रिकर

0
885

पणजी मधील सगळ्या प्रश्नांची मला जाण आहे.कचरा,पार्किग,संतीनेज नाला सफाई आदि प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात आली आहेत.मतदारांना भेटून त्यांची मते जाणून घेण्या बरोबर आम्ही आमचा पुढचा पाच वर्षांचा प्लान त्यांच्या समोर ठेवला आहे.पणजी वासीय चांगले मताधिक्य देतील याची आपल्याला खात्री आहे,असे मत मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केले.
पर्रिकर म्हणाले,माझ्या कारकीर्दीत पणजीचे अनेक प्रश्न मी सोडवले.शहरामधील शाळा कुजीरा येथे नेल्यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली आहे.शहराची कनेक्टिविटी वाढवताना आवश्यक तिथे चार पदरी रस्ते केले आहेत.पार्किग जागा तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.कचरा प्रकल्प मार्गी लागला आहे.पणजी वासियांना माझ्यावर विश्वास असल्याने माझा विजय निश्चित असून प्रश्न फक्त मताधिक्याचा उरला आहे.निवडणूक गणेशोत्सवाला लागून आल्याने मतदान कमी होईल असे वाटत होते मात्र मीडियाने निवडणुकीचे वातावरण तयार केल्याने मतदानाची टक्केवारी वाढेल असे पर्रिकर म्हणाले.यावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, प्रदेश सरचिटणीस सदानंद तानावडे, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते.