पणजी,वाळपई पोटनिवडणुकीसाठी 11 अर्ज दाखल

0
1271

पणजी आणि वाळपई मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 11 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. पणजी मतदारसंघातून 6 तर वाळपई मतदारसंघातून 5 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.7 ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून 9 ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.त्यानंतर दोन्ही मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.