पणजीला मॉडल शहर बनवणार:पर्रिकर

0
980
  • मुख्यमंत्री तथा पणजी पोटनिवडणुकीचे भाजप उमेदवार मनोहर पर्रिकर यांच्या जाहिरनाम्याचे आज भाजप मुख्यालयात प्रकाशन करण्यात आला.पणजी मधील कचरा, पार्किंग,वाहतूक समस्या सोडवण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पर्रिकर यांनी जाहिरनाम्याच्या माध्यमातून दिले आहे.यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडूलकर,खासदार नरेंद्र सावईकर,माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर आदी नेते उपस्थित होते.आपल्या संदर्भात विरोधक नैराश्य आल्याने खोट्या बातम्या पसरवत असून त्या विरोधात सायबर क्राइम आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याचे पर्रिकर यांनी यावेळी सांगितले.