पणजीमध्ये राष्ट्रीय सिल्क एक्स्पोचा प्रारंभ

0
1425

गोवाखबर: ग्रामीण हस्तकला विकास समितीद्वारे राष्ट्रीय सिल्क एक्स्पोचे गोव्यात आयोजन करण्या आले असून त्यात देशभरातील कारागीर सहभागी होऊन अस्सल पारंपरिक व शुद्ध रेशमी आणि कॉटनची उत्पादने मांडणार आहेत. येऊ घातलेला लग्नसराईचा हंगाम तसेच हिवाळ्याच्या निमित्ताने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे प्रदर्शन २१  ते २६  मार्च २०१७ दरम्यान सकाळी ११ ते रात्री ९ या दरम्यान , तालिगाव कमुनिटी सेण्टर, पणजी, गोवा येथे सुरू राहाणार आहे.
ग्रामीण हस्तकला विकास समितीने कारागीर, डिझायनर्स, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमींचा एक समूह स्थापन केला असून त्याद्वारे पारंपरिक कौशल्य, कॉटन आणि विणकरांच्या गुणवत्तेला आधुनिक व आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
शंभरपेक्षा जास्त विणकर आणि डिझायनर्स या प्रदर्शनात सहभागी होणार असून ते दिमाखदार ओपाडा, बनारस सिल्क, गढवाल, धर्णावरम, जामदनी, जमावार, संबळपुरी यांसारखी उत्पादने प्रदर्शनात मांडतील. त्याशिवाय देशभरातील विविध प्रांतांच्या साड्या, ड्रेस मटेरियल, रेशमी वस्तू आणि कॉटनच्या साड्या, सूट ड्रेस मटेरियल, फॅशन दागिने, घरसजावटीच्या वस्तू, डिझायनर कपडेही यात पाहायला मिळतील.
राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, ओडिशा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, गुजरात, जम्मू- काश्मीर आणि पश्चिम बंगाल ही राज्ये १,५०,००० रुपयांच्या वस्तू मांडतील.
प्रदर्शनात पाचशे ते दोन लाख रुपयांपर्यंतची रेशमी व कॉटन हातमागाची उत्पादनेही उपलब्ध केली जाणार आहेत.
प्रदर्शनात मांडण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांमध्ये कोईम्बतूर सिल्क, तमिळनाडूचे जीवरम सिल्क, बेंगळुरू सिल्क, क्रेप आणि जॉर्जेट साडी, कर्नाटकचे रॉ सिल्क मटेरियल, कलमकारी,  पोचमपल्ली, मंगलगिरी ड्रेस मटेरियल उपाडा, गढवाल, धर्णावरम, आंध्र प्रदेशची प्युअर सिल्क जरी साडी, टस्सर, कांथा, भागलपूर सिल्क ड्रेस मटेरियल, ब्लॉक हँडप्रिंबिहारचे ट, खादी सिल्क आणि कॉटन ड्रेस मटेरियल. कोसा सिल्क, घिचा सिल्क, मलबेरी रॉ सिल्क, छत्तीसगढची ब्लॉक प्रिंटेड सिल्क साडी, बांधणी, पटोला, कच्छ एम्ब्रॉयडरी, गुजराती मिरर वर्क आणि गुजरातच्या डिझायनर कुर्ती, ताबी सिल्क सारी, पश्मिना शाली, चिनान सिल्क सारी, जयपूर कुर्ती, ब्लॉक प्रिंट्स, संगनेरी प्रिंट्स, राजस्थानचे कोटा डोरिया, तंचोई, बनारसी, जामदनी, जमावर, जामदनी, ब्रोकेट ड्रेस मटेरियल, उत्तर प्रदेशचे लखनवी चिकन, शांती निकेतन, कांथा साडी, डिझायनर साडी, बलचारी, नीमझरी साडी, प्रिंटेड साडी, पश्चिम बंगालची धकई जामदनी आणि महाराष्ट्राची जरी पैठणी प्रदर्शनात उपलब्ध असेल.
 जयेश कुमार गुप्ता, राष्ट्रीय सिल्क एक्स्पोचे आयोजक म्हणाले, ‘विणकरांना प्रोत्साहन देणे आणि हस्तमाग उद्योगाला चालना देणे हे हस्तकला प्रदर्शनाचे एकमेव उद्दिष्ट आहे. आम्ही आतापर्यंत भारतातील २५ शहरांमध्ये १५० प्रदर्शने आयोजित केली आहेत. ही वस्त्रप्रावरणे अभिनव आहेत आणि अशा प्रदर्शनांद्वारे आम्ही ती लोकांपर्यंत पोहोचवतो.