पणजीत लाखो रूपयांच्या नोटा जळून खाक

0
954

पणजीतील धनलक्ष्मी बँकेचे एटीएम जळून खाक;लाखो रुपये जळाल्याचा संशय
पणजी:राजधानी पणजी मधील एमजी रोडवरील धनलक्ष्मी बँकेचे एटीएम काल रात्री जळून खाक झाले.एटीएम मधील लाखो रुपये जळून गेले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे.रात्री साडे नऊच्या सुमारास आग लागली.
एमजी रोडवर धनलक्ष्मी बँकेशेजारी बँकेचे एटीएम आहे.रात्री सव्वा नऊ ते साडे नऊ दरम्यान शार्ट सर्किटमुळे एटीएमला आग लागली.बघता बघता आग भडकत गेली.एटीएमच्या वर एसीचे 4 कॉम्प्रेसर होते ते देखील आगिच्या भक्ष्यस्थानी पडले. अग्निशामक दलाच्या जवानांनी खबर मिळताच घटनास्थळी धाव घेऊन 2 बंबाच्या सहाय्याने आग विझवण्यात यश मिळवले असले तरी दरम्यानच्या काळात एटीएम पूर्ण पणे जळून खाक झाले होते.एटीमच्या वरती आणखी आस्थापने आहेत.शेजारी विशाल मेगा मार्ट आहे.आग जास्त फैलू नये यासाठी अग्निशामक दलाने केलेले प्रयत्न यशस्वी ठरले.आग आणखी भड़कली असती तर मोठा अनर्थ घडला असता. आगीत नेमके किती रुपये जळून खाक झाले हे तपासा नंतरच स्पष्ट होणार आहे.