पणजीत रंगली गरवणीच्या मासेमारीची स्पर्धा

0
943
गोवा खबर:  फिश करी राइस नसेल तर एक घास देखील गोमंतकीयांच्या घशा खाली उतरत नाही.गोमंतकीय मासे खाण्या बरोबर छंद म्हणून गळ टाकून तासन तास बसून मासे पकडण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
वीकेंड किंवा सुट्टीचा दिवस असला की अनेकजण फिशिंग रॉड घेऊन घरा बाहेर पडतात आणि नदी,नाले,खाडी किंवा मानशी किनारी जाऊन तळ ठोकतात आणि आपली मासे पकडायची हौस भागवतात..
यूनाइटेड फ्रेंड्स ऑफ पणजी तर्फे अशा गोमंतकीयांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी मासेमारी स्पर्धा आयोजित केली जाते.यंदा स्पर्धेचे 12 वे वर्ष असून स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढतच जात आहे..
यंदा जवळपास 80 स्पर्धक राज्यभरामधून स्पर्धेत सहभागी झाले होते.कोणी रॉड घेऊन तर कोणी फक्त रील टाकून आपल्या पद्धतीने मासेमारी करत होते.मासेमारी स्पर्धकांमुळे जुन्या सचिवालया समोरील मांडवी किनारा रंगेबिरंगी बनला होता.बांदोडकर मार्गा वरुन जाणारे पर्यटक थांबुन स्पर्धेची माहिती आणि सेल्फी घेत होते.
स्पर्धेत 10 वर्षाच्या चिमुरडे पासून 75 वर्षीय आजोबा सहभागी झाले होते.
1 किलोचा रेड फिश ज्याला स्थानिक भाषेत तामसो पकडणारा सर्वेश स्पर्धेचा विजेता ठरला. आयोजकांतर्फे सगळ्याना छोटी मोठी बक्षीसे देऊन प्रोत्साहित करण्यात आले.कडक उन्हात देखील स्पर्धकांनी तब्बल 3 तास मासेमारीचा आनंद लुटला