पणजीत उद्यापासून भरणार पुरुमेंताचे फेस्त

0
500
गोवा खबर:पावसाळ्यात लागणाऱ्या वस्तूंची बेगमी करता यावी यासाठी दरवर्षी पणजी आरोग्य केंद्रा शेजारील रस्त्यावर भरणारे पुरुमेंताचे फेस्त यंदा नॅशनल थियेटर शेजारील रस्त्यावर उद्या पासून भरणार आहे.हे फेस्त आठवडाभर चालणार असून त्यात स्थानिक शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने मांडण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.
महापौर मडकईकर यांनी आज फेस्त भरणाऱ्या रस्त्यावर शारीरिक दूरीसाठी केल्या जाणाऱ्या आखणीची पाहणी केली. आता पर्यंत दहा जणांनी नोंदणी केली आहे.त्याशिवाय दरवर्षी फेस्ताला येणाऱ्या शेतकरी आणि विक्रेत्यांना देखील जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.पन्नास ते पंचावन्न जण बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.यंदा म्हापसा येथील शुक्रवारचा बाजार बंद असल्याने पणजी येथील बाजाराला लोकांचा प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.