पणजीत आपतर्फे वाल्मीकि नाईक यांना उमेदवारी

0
646
गोवा खबर: पणजी येथील पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षातर्फे वाल्मिकी नाईक यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सर्व पक्षाचा भाजपला पराभूत करणे हा एकच हेतू असून त्यांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन आपचे संयोजक एल्विस गोम्स यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी प्रदीप पाडगांवकर, शेखर नाईक, सुनील शिंगणावरकर आणि बेट्रीस पिंटो यांची उपस्थिती होती.
 गोम्स म्हणाले, काँग्रेस पक्षाकडे उत्तर गोव्यात उमेदवार नाहीत म्हणून ते दक्षिणेतून उमेदवार आणतात. पणजी पोटनिवडणुक लढवण्यासाठी त्यांच्याकडे उमेदवार नाही त्यामुळे त्यांनी आम्हाला सहकार्य करावे. यापुर्वी पोटनिवडणुकीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष स्व. शांताराम नाईक यांनी आम्हाला आपचा उमेदवार न ठेवण्याची विनंती केली होती व आपल्याला सहकार्य करण्यास सांगितले होते. त्यावेळी आम्ही त्यांचे एकले तर आता काँग्रेसने आम्हाला सहकार्य करावे.