पणजीचे पोलिस निरीक्षक ठरले सर्वात तरुण राष्ट्रपती पदकाचे मानकरी

0
1113

स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस पदकांची घोषणा

 गोवा खबर:गोव्यातून पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे.या पदकासाठी ते सर्वात तरुण पोलिस अधिकारी ठरले आहेत.
शिरोडकर यांच्या सोबत वाहतूक विभागाचे पोलिस अधिक्षक दिनराज गोवेकर,निवृत्त उप पोलिस अधिक्षक रमेश गावकर,वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल झुबेर मोमिन यांना उत्कृष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे.पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई व महिला पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा ताळगावकर यांना प्रशंसनीय सेवेसाठी पोलिस पदक जाहीर झाले आहे. त्याशिवाय राजेंद्र अनंत हळदणकर व आनंदू कुष्टा वेळीप () तसेच राधिका राजन हळर्णकर () व उदय नागप्पा कुरी ( ) यांना पदक जाहीर झाले आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त 942 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर झाली आहेत. 2 कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक (पीपीएमजी), 177 कर्मचाऱ्यांना पोलीस शौर्यपदके, 88 कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तर 675कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस पदके जाहीर झाली आहेत.

महाराष्ट्रातील 8 कर्मचाऱ्यांना पोलीस शौर्यपदक, 3 कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तर 40 कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस पदके जाहीर झाली आहेत.

पदक विजेत्यांची यादी www.mha.nic.in आणि pib.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.