पंधरा नव्या दुचाकी रुग्णवाहिका सेवेत दाखल

0
1169

गोवा खबर:आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मंगळवारी १५ नव्या दुचाकी अॅम्बुलन्सचे लोकार्पण  केले. यावेळी आरोग्य संचालक डॉ. संजीव दळवी, मर्कचे कन्ट्री स्पीकर नितीन सिंग, विकास गुप्ता, बिपीन देशपांडे, रेखा विजयकुमार, सी. ए. मिनेझिस (मर्क, गोवा), वैभव कोरगावकर, त्रिपिटा मडकईकर आणि एस. शिवराजन (सहाय्यक संचालक, मर्क गोवा) आदी उपस्थित होते.
रुग्णवाहिकांचे लोकार्पण आरोग्यमंत्री राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्यानंतर त्यांनी या रुग्णवाहिकांना हिरवा झेंडा दाखविला.राज्यातील लोकांचे जीवन वाचविणे हे आमचे अभियान आहे. यासाठी सरकारकडून सातत्याने विविध योजना अमलात आणल्या जात आहेत. त्यासाठी मर्क या औषध निर्माता कंपनीकडून सामाजिक बांधिलकी जबाबदारी योजनेतून ५० लाख रुपये देण्यात आले आहेत. त्यातूनच या पंधरा नव्या प्राथमिक प्रतिसाद दुचाकी रुग्णवाहिका आरोग्य सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री राणे यांनी १५ नव्या दुचाकी अॅम्बुलन्स लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले.