पंतप्रधान मोदी यांची मॉरिशसच्या पंतप्रधानांशी चर्चा

0
1169

गोवा खबर:नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभात सहभागी होण्यासाठी आलेले मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्याशी आज पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केली.

या द्विपक्षीय बैठकीत जगन्नाथ यांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने निवडून आल्याबद्दल मोदी यांचे अभिनंदन केले. मोदी यांनी जगन्नाथ यांचे आभार मानले तसेच दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ करण्यासाठीची कटिबद्धता व्यक्त केली. दोन्ही देशांची सुरक्षितता तसेच विकासासाठी आणि हिंदी महासागर प्रदेशाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करण्याबद्दल दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.