पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी तीस हजारांच्या जमावासाठी तयारी सुरु

0
720
गोवा खबर: १० एप्रिल रोजी बांबोळी येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम  मध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या प्रचार सभेच्या तयारीला सुरुवात झाली आहे. 
भाजपच्या दोन लोकसभा आणि तीन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणू कांच्या प्रचारासाठी ही सभस फार महत्वाची मानली जात आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते सध्या नियोजनात व्यस्त आहेत.
स्टेडियम मध्ये मोदींचे भाषण ऐकण्यासाठी तीस हजार लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे.त्यामुळे जागेची क्षमता लक्षात घेता ज्या लोकांना स्टेडियम मध्ये प्रवेश मिळू शकणार नाही त्यांच्यासाठी पक्षाने स्टेडियम बाहेर पाच स्क्रीन्स उभारण्याचे ठरवले आहे.
लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून मोदींची ही पहिलीच सभा असणार आहे.
या सभेत पंतप्रधान मोदी खाणकामाच्या पुनरारंभाच्या समस्येवर आणि गोवा पर्यटन उद्योग अशा दोन महत्वाच्या विषयांवर पक्षाची भूमिका मांडणार असल्याचे स्थानिक नेत्यां कडून सांगितले जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पंतप्रधान मतदानाच्या आधी राज्यासाठी एक मोठी घोषणा करणार आहेत ज्याची वचनपूर्ती ते सत्तेत आल्यावर करणार आहेत.
पाचही उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे पण मोदींच्या सभेनंतर त्यांच्या प्रचाराला अधिक चालना मिळणार असल्याचे पक्षाचे सरचिटणीस सदानंद तानावडे यांनी सांगितले.
राज्यातील भाजप वरिष्ठ कार्यकर्ते, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडूलकर, दोन्ही खासदार आणि इतर कार्यकर्ते  सभेवेळी मंचावर हजर असणार आहेत.
मोदींच्या सभा नेहमीच जनतेचं लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या आहेत. देशात त्यांची लोकप्रियता लक्षात घेता ह्या सभेला अपेक्षेपेक्षा जास्त जनसमुदाय हजार असण्याची शक्यता देखील तानावडे यांनी व्यक्त केली आहे.