पंतप्रधान मोदींच्या सभेला 25 हजार लोक असणार:मुख्यमंत्री

0
786
गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्या होणाऱ्या प्रचार सभेच्या पार्श्वभूमीवर बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम मध्ये जय्यत तयारी सुरु आहे.सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यां सोबत स्टेडियम मध्ये आणि बाहेर सुरु असलेल्या तयारीचा आढावा घेतला.मोदी यांच्या सभेला 25 हजार लोक उपस्थित असतील असा दावा मुख्यमंत्री सावंत यांनी केला आहे.
स्टेडियम कडे जाणाऱ्या सगळ्या रस्त्यावर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.स्टेडियम मध्ये आसन व्यवस्था लावण्याचे आणि बाहेर 4 मंडप घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. स्थानिक पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत.
स्टेडियम बाहेर लोकांना सभा पाहता यावी यासाठी 4 मंडप घालून त्यात मोठ्या स्क्रीन लावण्याचे काम सुरु आहे.स्टेडियम बाहेर 10 हजार लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
स्टेडियममध्ये आणि स्टेडियम बाहेर मिळून 25 हजार लोक सभेसाठी उपस्थित असतील,अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्री सावंत यांनी पणजी येथील भाजप मुख्यालयात पणजी भाजप मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यां सोबत मोदी यांच्या सभेच्या तयारीचा आढावा घेतला.त्यानंतर त्यांनी सभास्थळी जाऊन सुरु असलेल्या तयारीची पहाणी केली.