पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ चित्रपट अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल केला शोक व्यक्त

0
130

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ चित्रपट अभिनेता दिलीप कुमार जी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या निधनामुळे आपल्या सांस्कृतिक जगताचे खूप मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ट्विटसंदेशात पंतप्रधान म्हणाले,`दिलीप कुमारजी हे सिनेसृष्टीतील एक दिग्गज म्हणूनच कायम स्मरणात राहतील. त्यांना विलक्षण प्रतिभेची देणगी होती, ज्याद्वारे त्यांनी रसिकांच्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनामुळे आपल्या सांस्कृतिक विश्वाची खूप मोठी हानी झाली आहे.  त्यांचे कुटुंबिय, मित्रपरिवार आणि असंख्य चाहत्यांप्रती  सहानुभूती व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देवो.