पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या प्रचारासाठी 10 रोजी गोव्यात 

0
692
 गोवा खबर: लोकसभेच्या दोन  आणि  विधानसभेच्या तीन मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारक गोव्यात येऊन भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी प्रचारासाठी गोव्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांची प्रचार सभा 10 एप्रिल रोजी ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर  सायंकाळी 4.30 वाजता जाहीर सभा आयोजित केली आहे.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पूर्वी 12 एप्रिल रोजी ठरली होती. त्यात बदल करण्यात आला आहे. आता ही दोन दिवस आधी 10 एप्रिल रोजी सायंकाळी होणार आहे.
 केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह शिरोडा आणि म्हापसा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा होण्याची शक्यता आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे दक्षिण आणि उत्तर गोव्यात दोन वेगळ्या जाहीर सभा घेतील. गडकरी आणि स्मृती इराणी याही प्रचारात उतरणार आहेत या सभांच्या तारखा मात्र निश्चित व्हायच्या आहेत. लोकसभेसाठी उत्तर गोव्यातून भाजपातर्फे श्रीपाद नाईक तर दक्षिण गोव्यातून नरेंद्र सावईकर यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे.