पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह :तेंडुलकर

0
796
गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांबोळी येथील प्रचार सभेला प्रचंड गर्दी झाली.मतदार आणि कार्यकर्ते भाजपच्या कारभारावर समाधानी आहेत.पंतप्रधान मोदी यांचे भाषण एकलेले कार्यकर्ते जोषात आहेत.त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण झाले असून लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या चारही जागा भाजप मोठ्या मताधिक्क्याने जिंकेल,असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी व्यक्त केला.
तेंडुलकर म्हणाले,पंतप्रधान मोदी यांची कालची प्रचार सभा अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झाली.या सभेला चाळीसही मतदारसंघामधून 35 हजार पेक्षा जास्त लोक उपस्थित होते.मोदी यांनी गोमंतकीयांना आश्वस्त केले असून लोकसभेच्या दोन्ही जागा निवडून देत पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन करण्यात गोमंतकीय योगदान देतील यात शंका नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा यशस्वी केल्या नंतर भाजपचे कार्यकर्ते आता प्रत्येक मतदारसंघात मेळावे आणि छोट्या,मोठ्या सभा घेऊन मतदारांपर्यंत भजापची भूमिका पोचवणार असल्याचे सांगून तेंडुलकर म्हणाले,मोदी यांचे भाषण ऐकल्या नंतर कार्यकर्त्यां मध्ये उत्साह संचारला आहे.हेच कार्यकर्ते भाजपला निवडणूकां मध्ये जिंकण्यास आपली पूर्ण ताकद पणाला लावणार आहेत.
तेंडुलकर म्हणाले,केंद्रीय नेते नितिन गडकरी,सुरेश प्रभू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेते प्रत्येक मतदार संघात जाऊन मेळावे घेणार आहेत.केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग देखील प्रचार सभा घेणार आहेत.येत्या काही दिवसात वातावरण भाजपमय होऊन जाणार असल्याने आमचा विजय निश्चित आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे प्रत्येक मतदारसंघात जाऊन सभा घेणार आहेत.त्यांना स्थानिक आमदार,मंत्री आणि पदाधिकारी साथ देतील असे सांगून तेंडुलकर म्हणाले,भाजपने राज्यात आणि केंद्रात विकास करून दाखवला आहे.केंद्राच्या मदतीने राज्यात हजारो कोटी रुपयांची कामे सुरु आहेत.याच प्रकारची कामे करत स्वच्छ प्रशासन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याने मतदार आम्हालाच निवडून देतील यात शंका नाही.