पंतप्रधानांनी ह्युस्टनमध्ये शिख समुदायाच्या सदस्यांसोबत संवाद साधला

0
1177
The Prime Minister, Shri Narendra Modi interacting with the Indian community, in Houston, USA on September 21, 2019.

गोवा खबर:पंतप्रधानांनी ह्युस्टन, टेक्सास येथे शिख समुदायाच्या सदस्यांसोबत आज संवाद साधला. या सदस्यांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले.

The Prime Minister, Shri Narendra Modi interacting with the Indian community, in Houston, USA on September 21, 2019.

या संवादादरम्यान सदस्यांनी, संपूर्ण देशाच्या आणि शिख समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारत सरकारने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांबद्दल पंतप्रधानाचे आभार मानले.

“ह्युस्टन मध्ये शिख समुदायासोबत उत्तम संवाद साधता आला. भारताच्या विकासाबद्दल त्यांचा उत्साह पाहून मला आनंद झाला!” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर वरील संदेशात म्हटले आहे.

 टेक्सास येथे दाऊदी बोहरा समुदायाच्या सदस्यांची भेट घेतली

The Prime Minister, Shri Narendra Modi interacting with the Indian community, in Houston, USA on September 21, 2019.

पंतप्रधानांनी ह्युस्टन, टेक्सास येथे आज दाऊदी बोहरा समुदायाच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

या समुदायातील सदस्यांनी ह्युस्टन येथे पंतप्रधानांचा सत्कार केला. संवादादरम्यान दाऊदी बोहरा समुदायातील सदस्यांनी सैयदना साहिब यांच्यासोबतचे सहचर्य अधोरेखित केले. मोदींनी मागीलवर्षी इंदोर येथे त्यांच्या समुदायाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती, याची देखील आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

“दाऊदी बोहरा समाजाने जगभरात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. ह्युस्टनमध्ये त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची आणि त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करण्याची मला संधी मिळाली.” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर वरील संदेशात सांगितले.

पंतप्रधानांनी ह्युस्टन येथे काश्मिरी पंडितांसोबत संवाद साधला

The Prime Minister, Shri Narendra Modi interacting with the Indian community, in Houston, USA on September 21, 2019.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ह्युस्टन, टेक्सास येथे काश्मिरी पंडितांच्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली.

यावेळी समुदायातील सदस्यांनी, पंतप्रधानांनी भारताच्या प्रगतीसाठी आणि प्रत्येक भारतीयाच्या सक्षमीकरणासाठी उचललेल्या पावलांचे जोरदार समर्थन केले.

“मी आज ह्युस्टन येथे काश्मिरी पंडितांसोबत विशेष संवाद साधला.” असे पंतप्रधानांनी ट्विटर वरील संदेशात म्हटले आहे.