पंतप्रधानांनी केला फिटनेस व्हिडीओ शेअर, पोलीस अधिकाऱ्यांना दिले फिटनेस चॅलेंज

0
3683

 

गोवा खबर:विराट कोहली यांनी दिलेले तंदुरुस्ती आव्हान स्वीकारत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपला तंदुरुस्तीसाठीचा व्हिडीओ शेअर केला.

सकाळच्या व्यायामाचे क्षण शेअर करत आहे. योग करण्याबरोबरच पंचतत्वांपैकी काहींचा उपयोग करत ठरविलेल्या मार्गावरुन आपण चालतो असे सांगून यामुळे ताजेतवाने होऊन नवी ऊर्जा मिळत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. श्वासासाठीचे व्यायामही आपण करत असल्याचे सांगतानाच “हम फिट तो इंडिया फिट” असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

प्रत्येक भारतीयाने दिवसातला थोडा वेळ तंदुरुस्ती राखण्यासाठी द्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आपल्याला योग्य वाटणारा कोणताही व्यायामप्रकार निवडा आणि तो दररोज करा त्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल आपल्याला दिसेल. #FitnessChallenge #HumFitTohIndiaFit

पंतप्रधानांनी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी, टेबल टेनिसपटू मनिका बात्रा आणि भारतीय पोलीस सेवेतले सर्व अधिकारी विशेषकरुन वयाची चाळीशी पार केलेल्या अधिकाऱ्यांना पंतप्रधानांनी फिटनेस चॅलेंज दिले आहे. #FitnessChallenge

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी, भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करणारी आणि 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सर्वात जास्त पदकांची कमाई करणारी मनिका बात्रा, सर्व पोलीस अधिकारी विशेषकरुन 40 वर्षावरचे अधिकारी यांना फिटनेस चँलेज देत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.