पंतप्रधानांनी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस यांचे केले अभिनंदन

0
376

 

गोवा खबर:पंतप्रधान,नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस यांचे  अभिनंदन केले आहे.

“कमला हॅरीस आपले हार्दिक अभिनंदन! आपले यश पथदर्शक आहे आणि  आपल्यातील लोकांनाच नव्हे,तर सर्व भारतीय-अमेरिकनांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. आपल्या सहकार्याने आणि नेतृत्वाने भारत -अमेरिका यांच्यातील समृद्ध संबंध अधिकच दृढ होतील, असा मला विश्वास आहे,”असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.