गोवा खबर:योगाचा विकास आणि प्रसार यातील अमूल्य योगदानासाठीचे पंतप्रधान पुरस्कार, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विजेत्यांना प्रदान करण्यात येणार आहेत. रांची इथे आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.
कार्यक्रमात उद्या पंतप्रधानांच्या हस्ते 12 स्मृती टपाल तिकिटांचे अनावरण होणार आहे. 10 आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.