पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली लेहमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन-2020 चा मुख्य कार्यक्रम: श्रीपाद नाईक

0
305
The Minister of State for AYUSH (Independent Charge) and Defence, Shri Shripad Yesso Naik to announcing the Venue of the main event of IDY 2020 and winners of the second Awards for Excellence in Information Technology in AYUSH Sector, in New Delhi on March 11, 2020.

गोवा खबर:सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जून 2020 रोजी लडाखची राजधानी लेह येथे आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज नवी दिल्लीमध्ये ही माहिती दिली.

पंतप्रधान दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी होतात. ते या कार्यक्रमात सामान्य योग नियमावली (कॉमन योग प्रोटॉकॉल) सादर करतात. लेहमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेला अशा प्रकारच्या भव्य कार्यक्रम निश्चितच वेगळा ठरेल.

45 मिनिटांची योग प्रात्यक्षिके ही आंतरराष्ट्रीय योग दिनाचे ठळक वैशिष्टये आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी 15000 ते 20000 लोकांची उपस्थिती असेल, असा अंदाज आहे, असे श्रीपाद नाईक म्हणाले.