न्यूओ मॅजेस्टिक बंद करण्याच्या आदेशाला पंचायत संचालकांची स्थगिती

0
691
गोवाखबर:पर्वरी येथील न्यूओ मॅजेस्टिक हॉटेल बंद करण्याचा आदेश पेन्ह-द-फ्रान्स पंचायतीने दिला होता त्याला पंचायत संचालकांनी स्थगिती दिली असल्याची माहिती हॉटेल व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
कारणे दाखवा नोटीस न बजावता तसेच सुनावणी न घेता हॉटेल बंद करण्याचा आदेश देण्यात आला असल्याचे पंचायत संचालकांनी आपल्या स्थगिती आदेशात स्पष्ट केले आहे.
आपल्या पुढील आदेशा पर्यंत पंचायतीचा आदेश स्थगित ठेवावा असे संचालकांनी स्पष्ट केले आहे.18 रोजी पंचायतीने हॉटेल बंद करण्याचा आदेश दिला त्याला 19 रोजी पंचायत संचालकांनी स्थगिती दिली आहे.
हॉटेल व्यवस्थापनाने या प्रकारा बद्दल नाराजी व्यक्त करत कायदेशीर मार्गाने संबंधितांना उत्तर दिले जाईल असे स्पष्ट केले आहे.पैसे उकळण्यासाठी असे प्रकार काही लोक करत असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याची शक्यता हॉटेलच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
पेन्ह-द-फ्रान्स पंचायतीने 18 रोजी गोल्डन पीस हॉटेल्स अँण्ड रिसॉर्ट्स प्रा.लि. कंपनी तर्फे पर्वरी येथे चालवल्या जात असलेल्या हॉटेल न्यूओ मॅजेस्टिकला नोटीस पाठवून हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले होते.या हॉटेलमध्ये 98 खोल्या असून फक्त 20 खोल्यांचे व्यवसाय व इतर शुल्क पंचायतीला देते अशी बाब निदर्शनास आणून दिली होती.त्यावर हॉटेल व्यवस्थापनाने पंचायत संचालकांकडे दाद मागून स्थगिती घेतली आहे.