न्या. दीपक मिश्रा देशाचे नवे सरन्यायाधीश

0
1019

सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश दीपक मिश्रा हे देशाचे नवे सरन्यायाधीश असणार आहेत. केंद्र सरकारने आज या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले. विद्यमान सरन्यायाधीश जगदीशसिंह खेहर हे २७ ऑगस्ट रोजी निवृत्त होत असून त्यांच्याच शिफारशीवरून दीपक मिश्रा यांची नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

न्या. मिश्रा देशाचे ४५वे सरन्यायाधीश म्हणून २७ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून शपथ घेणार आहेत. ६३ वर्षीय मिश्रा हे विद्यमान सरन्यायाधीश खेहर यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. मिश्रा हे ओडिशामधील असून याआधी रंगनाथ मिश्रा आणि जी. बी. पटनायक यांच्या रूपाने देशाला ओडिशाने सरन्यायाधीश दिलेले आहेत. दीपक मिश्रा २ ऑक्टोबर २०१८ रोजी निवृत्त होणार आहेत.