नौदलाच्या विमानाने 60,000 मास्क दिल्लीहून गोव्यात आणले

0
245

गोवा खबर:इंडियन मेडिकल असोसिएशन, गोवा यांच्याकडून 60,000 मास्कची ऑर्डर देण्यात आली होती. मात्र सध्याच्या लॉकडाऊनमुळे मालवाहू ट्रक दिल्लीत अडकले होते. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन गोवा शाखेच्या अध्यक्षांनी यासंदर्भात गोव्यातील भारतीय नौदलाला विनंती केली होती.

नौदलाने आपल्या ल्युईशीन 38SD (IL-38) या लांब पल्ल्याच्या विमानाचा वापर करुन आजच्या आज दिल्लीच्या पालम विमानतळाशी संपर्क साधून सर्व साहित्य गोव्यात आणले.