नोशन प्रेस पब्लिशिंगमध्ये आता कोकणीचा समावेश ः नवोदित लेखकांना सुवर्णसंधी

0
851
गोवा खबर:  नोशन प्रेस पब्लिशिंग या भारतातील सर्वात मोठ्या प्रकाशन संस्थेने त्यांच्या प्रकाशनांमध्ये कोकणी या भाषेचा समावेश केला आहे.  नोशन प्रेस पब्लिशिंग प्रकाशन करीत असलेल्या भाषांमध्ये इंग्लीशशिवाय हिंदी, मराठी, गुजराथी, तमिळ, कन्नड व मल्याळम या भाषांव्यतिरिक्त कोकणीतील साहित्य प्रकाशन करणार आहे. भारतीय लेखक आता त्यांचे साहित्य पेपरबॅक व ई-बुकच्या स्वरुपात त्यांचे साहित्य  नोशन प्रेस पब्लिशिंगद्वारे प्रकाशित करू शकतील जे 100 हून अधिक देशांमधील वाचक वाचू शकतील.
याविषयी माहिती देताना  नोशन प्रेस पब्लिशिंगचे सीईओ नवीन वलसाकुमार यांनी सांगतिले की, भारतातील दर्जेदार साहित्याची मागणी वाढत आहे.   दर्जेदार प्रकाशन संस्थांपर्यंत अनेक लेखक पोहोचू शकत नसल्याने  देशातील अशा लेखकांसाठी नोशन पब्लिशिंगने एक्सप्रेस पब्लिशिंग हे नवीन व्यासपीठ तयार केले आहे. अशा प्रकराचे हे एकमेव व्यासपीठ आहे ज्यात नवीन लेखक त्यांची पुस्तके, कथा वा साहित्य 30 मिनिटात प्रसिद्ध करू शकतील. नोशनतर्फे एक अॅपसारखे एक पद्धती दिली जात असून त्यायोगे प्रकाशनाची संपूर्ण प्रक्रिया होते. व मुख्य म्हणजे लेखकांसाठी हे मोफत केले जाते. नोशन पब्लिशिंगची ही खासियत आहे, असे ते पुढे म्हणाले.
नोशन पब्लिशिंगचे मुख्य कार्यालय चेन्नई येथे असून भारत, सिंगापूर व मलेशियातून कामकाज केले जाते. कंपनीने दहा हजारांहून अधिक लेखाकाचे साहित्य प्रकाशित केले असून दीडशे देशात पुस्तके विकली आहेत.
नवीन वलसाकुमार यांनी पुढे सांगितले की, दर महिन्याला सुमारे वीस हजार लेखक इंटरनेटच्या माध्यमातून त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी शोध घेत असतात. मात्र कहाच लेखकाना त्यांचा मार्ग मिळतो. सध्या आमच्याकडे दर महिन्याला तीन हजार लेखक चाैकशी करतात. या लेखकांनी विविध प्रकारची साहित्य निर्मिती केलेली असते. साधारणपणे 55 मिनिटाला एक अशा प्रमाणात आम्ही दर महिन्याला 750 पुस्तके प्रकाशित करीत आहोत. भारतीय भाषांसाठी एक्सप्रेस पब्लिशिंगचा विस्तार करून येत्या पाच वर्षात एक लाख लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्याचे आमचे नियोजन व ध्येय आहे.
सन 2015 मध्ये केलेल्या नीलसेन अहवालानुसार भारतातील प्रकाशन उद्योग 4 दशलक्ष डाॅलर्सचा आहे ज्यामुळे सीएजीआर 19.3 टक्के वाढत आहे. हे जागातील सहाव्या क्रमांकाचे प्रकाशन मार्केट आहे. इंग्लीशमधील प्रकाशनांचा दुसरा क्रमांक आहे. 16 भाषांमध्ये 9000 प्रकाशक पुस्तके प्रकाशित करीत आहेत. मा6 हा उद्योग काही प्रमाणात विस्कळीत आहे. त्यामुळे नवीन लेखकांना त्यांचे साहित्य प्रकाशित करण्याची संधी मिळत नाही कारण योग्य तंत्रज्ञानाचा अभाव आहे. नोशन पब्लिशिंगने ही त्रुटी भरून काढली अाहे. यावेळी बालताना नोशन प्रेसचे सीटीओ भार्गव आडेपल्ली यांनी माहिती दिली की, भविष्यातील आमचे नियोजन स्पष्ट आहे. देशातील प्रत्येक लेखकाला प्रकाशनसाठी योग्य संधी आम्ही देणार असून त्यांच्या साहित्यासाठी योग्य बाजारही उपलब्ध करून देणार आहोत. नवीन लेखकांना नवीन वाचक मिळतील व त्यांच्या पुस्तकांची जाहिरात योग्य पद्धतीने होईल याचीही काळजी आम्ही घेणार आहोत.
गोव्यातील अनेक नवोदित कोकणी लेखकांनी त्यांच्या पुस्तकांसाठी नोशन पब्लिशिंगला संपर्क करावा व लवकरात लवकर त्यांची पुस्तके प्रकाशित करून घ्यावीत, असे आवाहन यावेळी भार्गव आडेपल्ली यांनी केले.