नोट बंदीचा फटका अर्थव्यस्थेला बसल्यामुळे जीडीपी घसरला :गोदरेज

0
944
जीएसटीचा देशाला भविष्यात फायदाच होणार
पणजी:जीएसटीमुळे सुरूवातीला थोडासा गोंधळ उडाला असला तरी सरकार कडून जलद गतीने मिळत असलेला प्रतिसाद बघितला तर जीएसटी भविष्यात देशासाठी फायदेशीर ठरेल असा विश्वास गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन नादीर गोदरेज यांनी व्यक्त केला.
इंडियन होम अँड पर्सनल केअर इंडस्ट्री असोसिएशनच्या परिषदेसाठी गोदरेज गोव्यात आले असून परिषदेच्या उद्धाटना पूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली.
1920 पासून होम आणि पर्सनल केअर इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असलेल्या गोदरेजचा जगभरात विस्तार सुरु असून त्याला मिळणारा प्रतिसाद वाढत असल्याचे गोदरेज म्हणाले.गोदरेजचा विविध उत्पादनांमधील वाटा 40 ते 45 टक्के असून साबणाची बाजारपेठ वाढत चालली असल्याचे गोदरेज यांनी सांगितले.
आमिर खानला घेऊन केलेल्या गोदरेज उत्पादनांच्या जाहिरातीचा कंपनीला झाल्याचे गोदरेज यांनी सांगितले.
इंडोनेशिया प्रमाणे भारता मध्ये देखील एअरप्रेशनर्सची बाजारपेठ वाढेल असा विश्वास गोदरेज यांना वाटतो.इंडोनेशिया मधील गोदरेजच्या एअरप्रेशनर्सचा मार्केट शेअर मोठा असून इंडोनेशिया मध्ये गोदरेजच्या एअरप्रेशनर्सची मागणी वाढत असल्याचे गोदरेज म्हणाले.भारतात अगरबत्ती आणि इतर पारंपरिक एअरप्रेशनर्सची साधने असल्याने एअरप्रेशनर्सची बाजारपेठ अपेक्षेप्रमाणे वाढत नसल्याचे गोदरेज म्हणाले.एअरप्रेशनर्स असो की इतर उत्पादने असोत ती छोट्या पाउच मध्ये आणि कमी किंमती मध्ये काढली तर त्याला मिळणारा प्रतिसाद चांगला असतो याकडे गोदरेज यांनी लक्ष वेधले.
होम अप्लायंसवरील जीएसटी 28 टक्के वरुन 18 टक्के झाली तर याक्षेत्रात असलेल्या कंपन्यांना फायदा होईल असे सांगून गोदरेज म्हणाले,साबण किंवा त्यासरखी उत्पादने सर्वसामान्य लोकांच्या जीवनात स्वच्छतेच्या बाबतीत महत्वाची भूमिका बजावत असल्याचे या उत्पादनां वरील जीएसटी कमी झाला तर सगळ्यांना फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला. नोट बंदीचा फटका अर्थव्यस्थेला बसल्याचे सांगून त्यामुळे जीडीपी घसरला असल्याचे गोदरेज यांनी स्पष्टपणे सांगितले.