नेहरु युवा केंद्राकडून कोविड-19 च्या काळात वानरमारे समुदायाला मोलाची मदत

0
137

 

 

 गोवा खबर:कोविड-19 च्या कठीण काळात नेहरु यवा केंद्राच्या स्वयंसेवक खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे ठरले आहेत. फोंडा तालुक्यातील निरंकाल गावात वानरमारे समुदाय वास्तव्यास आहे. दैनंदिन रोजगाराच्या आधारे आणि रान-जंगलात जे मिळेल त्या आधारावर ते आपली उपजिवीका करतात. मात्र, कोविड-19 ची परिस्थिती उद्भवली आणि लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. याचा त्यांनाही फटका बसला. कोरोनाविषयी त्यांना काहीही माहित नव्हते.

लॉकडाऊनच्या चार दिवसानंतर दक्षिण गोवा नेहरु युवा केंद्राचे रतीका गावकर, राहुल गावकर, सिद्धी गावकर, यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना कोविड-19 विषयी समजावून सांगितले. तसेच त्यांना यादरम्यान काय काळजी घ्यायची याचेही मार्गदर्शन केले. अन्नधान्य, बिस्कीट, साबण, सॅनिटायझर्स याचे वाटप केले.

 

अशा संकटाच्या काळात मदतीला धावून आल्याबद्दल समुदायातील ज्येष्ठ नागरिकांनी या युवकांचे आभार मानले.