नेशनवाइड पुरस्कार 2019 तर्फे 100 गुणवत्तापूर्ण व्यावसायिक आणि उद्योजकांचा सन्मान

0
639

 

गोव्यातील व्यावसायिक आणि उद्योजकांना पुरस्कार प्रदान

 

पुरस्कार विजेत्यांमध्ये उद्योग, फॅशन, हॉस्पिटल, शिक्षण, सामाजिक काम, आरोग्य आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील लोकांचा समावेश

 

गोवा खबर: बिझनेस मिंटच्या नेशनवाइड पुरस्कार 2019 चे स्वरुप आणखी भव्य झाले असून त्याच्या दुसऱ्या आवृत्तीचे नुकतेच गोव्यातील हॉटेल पार्क रेगिसमध्ये आयोजन करण्यात आले होते. उद्योगक्षेत्रातील मान्यवर तसेच विविध क्षेत्रांत चांगले काम करणाऱ्या व्यावसायिकांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचबरोबर स्वतःसाठी आणि आपल्या कंपनीसाठी ब्रँड नाव व प्रतिष्ठा तयार तरुण आणि उत्साही लोकांचे मनोबल वाढवण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्वोत्तम व्यावसायिक आणि उद्योजकांना विविध पुरस्कार देण्यात आले.

यावेळेस उद्योग, फॅशन, हॉस्पिटल, शिक्षण, सामाजिक काम, आरोग्य आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मिळून 100 पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यातील 14 पुरस्कार गोव्यातील व्यावसायिक आणि उद्योजकांना देण्यात आले. त्यामध्ये मंगल अनालिटिक्स अँड रिसर्च कन्सलटिंग प्रा.ला देण्यात आलेला बेस्ट कॉर्पोरेट कन्सलटिंग एजन्सी, वैद्यकीय क्षेत्रासाठी फालकन्स बायोमेड, क्लब ताओला गोव्यातील बेस्ट नाइट क्लबचा पुरस्कार, रूशइना वैद्य चानेकर यांच्या आर प्लस स्क्वेयरला सर्वोत्तम इंटेरियर डिझायनर, गोल्डन होमेझला सर्वोत्तम रियल इस्टेट कंपनी पुरस्कार यांचा समावेश आहे.

बिझनेस मिंटचे संस्थापक श्री. कोरापती विनय कांथ म्हणाले, गुणवत्तेची दखल घेण्यासाठी आणि तरुण व महत्त्वाकांक्षी लोकांपुढे यशस्वी लीडरचे उदाहरण घालून देणाऱ्या सर्वोत्तम व्यावसायिकांचे कौतुक करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम नेशनवाइड पुरस्कारांची दुसरी आवृत्ती आहे आणि आम्ही अशाप्रकारच्या आणखी आवृत्त्यांचे आयोजन करणार असून त्यायोगे आणखी मेहनत करून असे सन्मान मिळवण्यासाठी महत्त्वाकांक्षी उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे.

हे पुरस्कार देशभरातील लोकांना प्रदान करण्यात आले व त्यावेळेस वेगवेगळ्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गुंतवणूकदार आणि निर्णयसक्षम अधिकारी उपस्थित होते.

 

नेशनवाइड पुरस्कारांबद्दल – नेशनवाइड पुरस्कार हा भारतातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा आहे, ज्यात नाविन्यपूर्ण कामगिरी आणि भारताचे भविष्य नव्याने घडवण्याची चमक असणाऱ्यांचा सन्मान केला जातो.

 

बिझनेस मिंटबद्दल – बिझनेस मिंट ही बाजारपेठ संशोधन कंपनी आहे. बाजारपेठेतील माहितीचे एखाद्या व्यवसायाच्या विकास मार्गात पुढे जाण्याच्या दृष्टीने काय मूल्य असते हे त्यांना माहीत आहे. मग, ते नवे उत्पादन लाँच करणे असो किंवा चालू उत्पादन असो, कंपनी त्यांच्या ग्राहकांच्याबरोबरीने बाहेरच्या जगात मार्गक्रमण करते. बाजारपेठ संशोधनातील दर्जात्मक आणि संख्यात्मक अशी दोन्ही प्रकारची साधने, देशभरातील नोंदणीकृत एजन्सीजबरोबरचे नेटवर्किंग वापरून कंपनीच्या सेवा विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करतात.