२५ देशांतील २५० विद्यार्थ्यांना एकत्र आणत मॅक नॅशनल स्टुडंट्स मीटने (एनएसएम) दिली औद्योगिक जगतातील मोठ्या व्यक्तीमत्त्वांशी संवाद साधण्याची संधी
गोवा खबर: माया अकॅडमी ऑफ अडव्हान्स्ड सिनेमॅटिक्स (एमएएसी) – या हाय एंड थ्रीडी अनिमेशन आणि व्हिज्यअल इफेक्ट्स क्षेत्रातील भारतातील आघाडीच्या कंपनीने गोव्यामध्ये चार दिवसीय वार्षिक राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन केले होते. २५ राज्यांतील २५० विद्यार्थ्यांनी संपूर्ण देशभरातील अनिमेशन प्रेमींच्या उत्सुकतेचा विषय असलेल्या या परिषदेत हजेरी लावली.
ही परिषद आयोजित करण्यामागे देशभरातील अनिमेशन आणि व्हीएफएक्स विद्यार्थ्यांना एकत्र येऊन दर्जेदार सेमिनार, कार्यशाळा, केस स्टडीज, परिसंवाद आणि विविध सर्जनशील उपक्रमांत भाग घेण्यास प्रोत्साहन मिळावे असा हेतू होता. त्याशिवाय विद्यार्थ्यांना लाइव्ह प्रकल्पांत सहभागी होण्यासाठी आवश्यक व्यासपीठ मिळावे, व्यावसायिकांना भेटता यावे व वास्तविक आयुष्यातील अनुभव आणि ज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेबद्दल समूह प्रमुख विपणन अधिकारी श्री. प्रवीर अरोरा म्हणाले, ‘उदयोन्मुख अनिमेटर्सना इंडस्ट्रीतील दिग्गजांशी संवाद साधण्याची व त्यांच्याकडून बरंच काही शिकण्याची संधी आम्हाला द्यायाची होती. सिनेमॅटिक्स क्षेत्रात नाविन्य आणि सर्जनशीलता अतिशय महत्त्वाची असते. जेव्हा कित्येक सर्जनशील मने एकत्र येतात, तेव्हा आमच्यासाठी तो अभूतपूर्व योग असतो. ही परिषद आयोजित करण्यामागे विद्यार्थ्यांना तज्ज्ञांपर्यंत तसेच त्यांच्या बरोबरीच्या इतरांपर्यंत पोहोचता यावे हा हेतू होता. एनएसएममध्ये आयोजित करण्यात आलेले परिसंवाद आणि लेक्चर्सद्वारे आम्हाला विद्यार्थ्यांना भरपूर ज्ञान देऊन सक्षम करायचे आहे, ज्याचा त्यांना भविष्यात मोठा फायदा होईल.’
या कार्यक्रमांसाठी पुढील दिग्गजांनी हजेरी लावली
मधू नायर – प्रमुख बिल्ड, डीएनईजी, भारत
विवेक बोलार – मुख्य कार्यकारी अधिकारी, अनिमेशन स्टडीज
शेखर दोशी – विभागप्रमुख – प्रॉडक्शन, हॅपी फिनिश, भारत
मंजुल भारद्वाज – थिएटर व्हिजनरी
आरके चांद – सह- संस्थापक आणि संचालक- व्यवसाय विकास – गोल्डन रोबोट अनिमेशन (ए ग्रीन गोल्ड अनिमेशन कंपनी)
‘ग्लोबल अनिमेशन, व्हीएफएक्स अँड गेम्स इंडस्ट्री – स्ट्रेटेजीस, ट्रेंड्स अँड अपॉर्च्युनिटीज २०१८’ या अहवालानुसार जागतिक अनिमेशन इंडस्ट्रीचे एकूण मूल्य २०१७ मध्ये २५४ अब्ज डॉलर्स होते आणि ते २०२० पर्यंत २७० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. केबल आणि सॅटेलाइट टीव्ही, कमी खर्चात उपलब्ध होणारी इंटरनेट सुविधा, व्हिडिओज पाहाण्यासाठी मोबाइलची वाढती लोकप्रियता यामुळे ब्रॉडकास्टिंग तासांत वाढ झाली असून पर्यायाने अनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंगसाठी असलेली मागणी वाढल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर अनिमेशन आणि व्हीएफएक्स कौशल्ये व्हर्च्युअल रिअलिटी व ऑग्युमेंटेड रिअलिटीसारख्या क्षेत्रांसाठी फायदेशीर असल्याचे समजले जात आहे. सध्या टीव्ही, बँकिंग, मनोरंजन, ऑनलाइन शॉपिंग, संकेतस्थळांचे डिझाइन इत्यादी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनिमेशन पाहायला मिळत असल्यामुळे अहवालातील या नोंदीना पुष्टी मिळते. अनिमेशन वैविध्यपूर्ण आणि मागणीत असलेले कौशल्य आहे, कारण जाहिरात, आर्किटेक्चर, विमानसेवा, हॉस्पिटॅलिटी, पर्यटन, इंजिनियरिंग, हॉस्पिटल्स, मीडिया आणि मनोरंजन इत्यादी क्षेत्रांत सर्वत्र करियरसाठी वाव मिळू शकतो.
मॅकबद्दल
माया अकॅडमी ऑफ अडव्हान्स्ड सिनेमॅटिक्स (एमएएसी) ही हाय एंड थ्रीडी अनिमेशन आणि व्हिज्यअल इफेक्ट्स क्षेत्रातील भारतातील आघाडीची कंपनी आहे. २००१ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या आणि अप्टेक लि. चा मोठा ब्रँड असलेल्या या कंपनीने देशभरातील ३० हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. कंपनीची भारतातील ४० शहरांत अत्याधउनिक पायाभूत सुविधांसह ८० केंद्रे कार्यरत आहेत.
मॅकद्वारे थ्रीडी अनिमेशन आणि व्हिज्यअल इफेक्ट्स उद्योगक्षेत्राशी संबंधित करियर अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात. इथे विद्यार्थ्यांना वास्तविक प्रशिक्षणासह दर्जेदार शिक्षकवर्ग, पायाभूत सुविधा आणि आधुनिक तांत्रिक शैक्षणिक साधने पुरवली जातात.
मॅकचे विद्यार्थी मॉडेलिंग आर्टिस्ट्स, लाइटनिंग आर्टिस्ट, रेंडर आर्टिस्ट, कॅरेक्टर अनिमेटर, ले- आउट आर्टिस्ट, डिजिटल स्क्ल्पटर, रिगिंग आर्टिस्ट, एफएक्स आर्टिस्ट, रोटो आर्टिस्ट, मॅच मूव्हर, व्हिडिओ एडिटर, मोशन ग्राफिक आर्टिस्ट, कंपोझिटर्स, व्हिज्युअलाझेस, कंटेट डेव्हलपर्स आणि प्राइम फोकस, ऱ्हिदम अँड ह्यूज स्टुडिओस क्रेस्ट अनिमेशन स्टुडिओज, बिग अनिमेशन, कॉर्नरशॉप, ईएफएक्स, टुन्झ अनिमेशन, डीक्यू एंटरटेनमेंट, पॅपरिकाज अनिमेशन स्टुडिओज, एनडीटीव्ही, स्टुडिओ नाइन, रेड चिलीज. व्हीएफएक्स, वैभव स्टुडिओज, आयबीएन७, अनिमेशन, पिक्सन आणि टाटा एलेक्सी लि. शा आघाडीच्या अनिमेशन स्टुडिओमध्ये प्री व पोस्ट प्रॉडक्शन अधिकारी म्हणून घेतले जातात.
अधिक माहितीसाठी भेट द्या http://www.maacindia.com/Default.aspx