नॅशनल एक्स्पोर्ट इन्शुरन्स अकाऊंट ट्रस्ट साठी निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

0
1211

 गोवाखबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थ विषयक केंद्रीय समितीने नॅशनल एक्स्पोर्ट इन्शुरन्स अकाऊंट ट्रस्टला(NEIA) 1,040 कोटी रुपये अनुदानपर मदत द्यायला मंजुरी दिली आहे.

या निधीचा वापर  2017-18 ते  2019-20 या तीन वर्षात केला जाईल. वर्ष 2017-18 साठी 440 कोटी रुपये याआधीचमिळाले आहेत. वर्ष 2018-19 आणि  2019-20 साठी एनईआयएला प्रत्येकी 300 कोटी रुपये दिले जातील.

या निधीमुळे एनईआयए देशातील धोरणात्मक आणि राष्ट्रीय महत्वाच्या निर्यात  प्रकल्पांना अर्थसहाय्य

पुरवण्यास समर्थ असेल.