नॅट/ सॅट परिक्षेस इच्छुक असलेल्या उमेदवारासाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन

0
704

 गोवा खबर नॅशनल टेस्टींग एजन्सी आणि पुणे विध्यापिठाने जून २०२० मध्ये आयोजित केलेली संगणक आधारित युजीसी नॅट/ सॅट परिक्षा देण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी उच्च शिक्षण संचालनालयाच्या वतीने मार्गदर्शन सत्र आयोजित केली आहेत.

      नॅट/ सॅट परिक्षा मार्गदर्शन सत्राचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी http://forms.gle/d.jtbmzqrpzubzbe6.वर गुगल अर्जातून आपली माहिती भरावी. ज्या उमेदवारांनी या अगोदर मार्गदर्शन सत्रास नावनोंदणी केलेली आहे आणि ज्यांच्याकडे उच्च शिक्षण संचालनालयाने दिलेले नावनोंदणी कार्ड आहे त्यानीही गुगल अर्ज भरावा परंतु त्याना नोंदणी शुल्कात सूट मिळेल. सर्वसामान्य/ ओबीसी उमेदवारांसाठी १००० रूपये तर याअगोदर नोंदणी केलेल्या आणि मार्गदर्शन सत्रास हजर असलेल्याना ३०० रूपये, एससी,एसटी, पीएच उमेदवारांसाठी ५०० रूपये आणि या अगोदर नोंदणी केलेल्या आणि मार्गदर्शन सत्रास हजर असलेल्याना २५० शुल्क आहे. विध्यार्थी वर्गासाठी २५० रूपये आणि याअगोदर नोंदणी केलेल्या आणि मार्गदर्शन सत्रास हजर असलेल्याना १५० रूपये शुल्क आहे. एससी,एसटी, पीएच उमेदवारांसाठी १५० रूपये आणि याअगोदर नोंदणी केलेल्या आणि मार्गदर्शन सत्रास हजर असलेल्याना १०० रूपये शुल्क आहे.

      पूर्ण माहिती सादर करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२० अशी आहे. उशीरा पोचलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. नोंदणी शुल्क रोख किंवा डिमांड ड्राफ्टने उच्च शिक्षण संचालनालयाच्या नावे भरावे. अर्ज जातीचा दाखला, विध्यार्थी ओळखपत्र, नोंदणी शुल्क भरल्याची पावती आणि इतर माहिती तपासल्यानंतर २८ फेब्रुवारी २०२० पासून उच्च शिक्षण संचालनालय, सांख्यिकी विभाग, दुसरा मजला, एस ७-एएसीईआरटी इमारत, पर्वरी येथे नोंदणी कार्डे जारी करण्यात येईल. नोंदणी कार्डासाठी दोन छायाचित्रे देणे. नोंदणी कार्ड मिळविण्याची शेवटची तारीख ६ मार्च २०२० अशी आहे. पीजी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकणारे विध्यार्थी अर्ज करू शकतात.

      मार्च,एप्रिल आणि मे महिन्यात उत्तर आणि दक्षिण गोव्यातील विध्यार्थांसाठी वेगळी मार्गदर्शन सत्रे होतील. विषयांप्रमाणे मार्गदर्शकांची नावे आणि इतर माहिती www.dhe.goa.gov.in वर अपलोड करण्यात येईल. संबंधित विषयांच्या मार्गदर्शकाकडे विध्यार्थी संपर्क साधू शकतात.