नूतन राज्यपाल सत्यपाल मलिक गोव्यात दाखल

0
744

गोवा खबर :नूतन राज्यपाल सत्यपाल मलिक आज दुपारी गोव्यात दाखल झाले.सभापती  राजेश पाटणेकर,मंत्री मिलिंद नाईक, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दाबोळी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी  राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे राजभवनवर जाऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि कार्यकाळा चांगला जावा यासाठी  राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.

 

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधिश जस्टीस प्रदिप नंदराज जोग उद्या ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता राजभवनात राज्यपाल  सत्यपाल मलिक यांना राज्यपाल पदाची शपथ देणार आहेत.
राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांनी २५ ऑक्टोबर रोजी  मलिक यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.