निस्सान किक्सच्या विक्रीचा आज शुभारंभ

0
997
गोवा खबर :निस्सानचे गोव्यातील अधिकृत विक्रेते ए एम व्हेंचर्स यांच्या शोरुममध्ये निस्सान किक्सच्या विक्रीला शुभारंभ झाला आहे. निस्सानने ही संपूर्ण नवी अर्बन एसयूव्ही बाजारात आणली आहे. १.५ लिटर पेट्रोल आणि १.५ लिटर डिझेल अशा दोन्ही प्रकारात निस्सान किक्स उपलब्ध आहे. ४ व्हेरियेन्ट्स आणि ११ रंगात उपलब्ध असलेली निस्सान किक्स गोव्यातील कारप्रेमींना भुरळ घालणार असा विस्ऴास यावेळी एएम व्हेंचर्सने व्यक्त केला आहे.
परदेशातील मॉडेलपेक्षा भारतीय निस्सान किक्स आकाराने मोठी आहे. निस्सान-रिनॉल्ट संयुक्त प्रकल्पातील बीओ प्लॅटफॉर्मवर ही आधारलेली असून कोणत्याही प्रदेशात ती उपयोगी आहे. टेरानो प्रकारची निस्सान किक्सच्या १.५ लिटर पेट्रोल व्हर्जनमध्ये १०६पीएस व १४२एनएम पीक टॉर्क निर्माण होतो तर १.५ लिटर डिझेल व्हर्जनमध्ये ११० पीएस ऊर्जा व २४०एनएम पीक टॉर्क निर्माण होतो. पेट्रोल इंजिन ५-स्पीड तर डिझेल इंजिन ६-स्पीडमध्ये उपलब्ध केले आहे. त्यांच्या स्पर्धकांप्रमाणेच फक्त पुढच्या चाकांनाच ऊर्जा दिली जाते.
सेफ्टी व लाईफस्टाईल वैशिष्टांमध्ये निस्सान किक्स उजवी ठरली आहे. २.० व्हर्जन ६७ वैशिष्टांसह असून कार चालविण्याचे भविष्यच ते बदलून टाकणार आहे. ड्युएल एअरबॅग्ज, एबीएस ही सामान्य वैशिष्टे आहेतच पण त्याशिवाय अँड्राईड ऑटो व ॲपल कारप्ले कॉम्पॅटेबिलीटीसह ८.० इच टचस्क्रीन इन्पोटेनमेंट सिस्टीम बसवलेली आहे. एसयूव्ही कार क्षेत्रात पर्थमच अरांऊंड व्ह्यू मॉनिटर हे किक्सचे वैशिष्ट आहे. हे वैशिष्ट केवळ ४० लाख रुपये व वत्यावरील कारमध्ये येत असते.
टेक्नोसाव्ही आधुनिक पिढीसाठी ही एक पर्वणीच आहे. एक्सएल, एक्सव्ही, एक्सव्ही प्री आणि टॉपसेक एक्सव्ही प्री(ओ) अशा चार व्हेरिएन्ट्समध्ये निस्सान किक्स उपलब्ध केली आहे. आऍटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, एलईडी प्रोजेक्टर हेडलँप्स, अराऊंड व्ह्यू मॉनिटर, स्पीड सेन्सिंग व ऑटो व्हॉल्यूम कंट्रोल ही अन्य वैशिष्टे आहेत. स्मार्ट वॉच कनेक्टिव्हीटीसह २१० मिमी ग्राऊंड क्लियरन्स, ५.२ मीटर्सची टर्निंग रेडियस आणि सुरक्षेसाठी अन्य काही महत्वाची वैशिष्टे आहेत.
हिल स्टार्ट असिस्ट, डायनॅमिक कंट्रोल (व्हीडीसी), ईबीडीसह एबीएस, ब्रेक असिस्ट, ४ एअरबॅग्ज, ६७ डिग्रीत फिरणारा फॉग लॅम्प व ॲन्टी इन्ट्रूजन बार या वैशिष्टांमुळे निस्सान किक्स नव्या युगाची मार्गदर्शक ठरली आहे. ४०० लिटर्स ची बूट स्पेस असलेली निस्सान किक्स पर्ल व्हाईट, ब्लेड सिल्व्हर, ब्राँझ ग्रे, अंबर ऑरेंज, डीप ब्ल्यू पर्ल, नाईट शेड व फायर रेड अशा विविध रंगात तसेच या रंगांच्या एकत्र रंगातही उपलब्ध असल्याने निस्सान किक्स एक फॅशन मॉडेल म्हणूनही ओळखली जाऊ शकते. किंमत आणि इतर माहितीसाठी एएम व्हेंचर्सला संपर्क करावा.