निसर्ग चक्रीवादळ आणि मॉन्सून दरम्यानच्या आपत्तींना प्रतिसाद देण्यासाठी पश्चिमी नौदल कमांड सज्ज

0
360

 

गोवा खबर:नैसर्गिक आपत्ती व इतर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या बचाव आणि मदत कार्यात सहाय्य पुरविण्याच्या प्रत्येक प्रयत्नात भारतीय नौदल नेहमीच आघाडीवर असते. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाल्याने अतिरीक्त पाऊस पडल्यास आणि शहरी आणि ग्रामीण भागातील पूर परिस्थिती निर्माण झाल्यास पश्चिमी नौदल कमांडने पश्चिम किनारपट्टीवरील संबंधित राज्य सरकारांच्या समन्वयाने पूर, बचाव आणि डायव्हिंग मदतीसाठी पुरेशी संसाधने जमा केली आहेत.

मुंबईत, महाराष्ट्र नौदल क्षेत्र पावसाळ्याच्या संपूर्ण हंगामात पाच पूर बचाव संघ आणि तीन डायव्हिंग संघांसह सज्ज असणार आहे. मोठ्या क्षेत्रात जलद प्रतिसाद देण्यासाठी हे पथक संपूर्ण शहरातील विविध नौदल भागात तैनात आहेत. या  टीम पूर्णपणे सुसज्ज आहेत आणि त्यांना बचाव कार्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. ज्ञात पूरग्रस्त भागांची माहिती हाती घेण्यात आली असून त्या दृष्टीने सर्व आवश्यक तयारी चालू आहेत.

अशीच व्यवस्था कारवार नौदल क्षेत्र, गोवा नौदल क्षेत्र तसेच गुजरात दमण आणि दीव नौदल क्षेत्रांतही केली आहे. संबंधित क्षेत्र आणि स्टेशन कमांडर्स राज्य प्रशासन, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या सतत संपर्कात आहेत जेणेकरून कमीतकमी वेळेत संकट परिस्थितीला प्रतिसाद मिळू शकेल.

निसर्ग चक्रीवादळ अरबी समुद्रात घोंघावत असल्याने सर्व पथके सतर्क झाली आहेत आणि वादळाच्या काळात लोकांना मदत व आपत्ती निवारणा (एचएडीआर) च्या कोणत्याही आवश्यकतेला प्रतिसाद देण्याची तयारी दर्शविली आहे. नैसर्गिक आपत्ती व इतर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या बचाव आणि मदत कार्यात सहाय्य पुरविण्याच्या प्रत्येक प्रयत्नात भारतीय नौदल नेहमीच आघाडीवर असते. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाल्याने अतिरीक्त पाऊस पडल्यास आणि शहरी आणि ग्रामीण भागातील पूर परिस्थिती निर्माण झाल्यास पश्चिमी नौदल कमांडने पश्चिम किनारपट्टीवरील संबंधित राज्य सरकारांच्या समन्वयाने पूर, बचाव आणि डायव्हिंग मदतीसाठी पुरेशी संसाधने जमा केली आहेत. अतिवृष्टीमुळे किनारपट्टीचे क्षेत्र पुराच्या पाण्यात बुडल्यास वेस्टर्न फ्लीटमधील जहाजे लोकांची मदत आणि आपत्ती निवारण (एचएडीआर)साठी सुसज्ज आहेत.

मुंबईत, महाराष्ट्र नौदल क्षेत्र पावसाळ्याच्या संपूर्ण हंगामात पाच पूर बचाव संघ आणि तीन डायव्हिंग संघांसह सज्ज असणार आहे. मोठ्या क्षेत्रात जलद प्रतिसाद देण्यासाठी हे पथक संपूर्ण शहरातील विविध नौदल भागात तैनात आहेत. या  टीम पूर्णपणे सुसज्ज आहेत आणि त्यांना बचाव कार्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. ज्ञात पूरग्रस्त भागांची माहिती घेण्यात आली असून त्या दृष्टीने सर्व आवश्यक तयारी चालू आहेत. अशीच व्यवस्था कारवार नौदल क्षेत्र, गोवा नौदल क्षेत्र तसेच गुजरात दमण आणि दीव नौदल क्षेत्रांतही केली आहे. याव्यतिरिक्त, मुंबई, गोवा आणि पोरबंदर येथील विविध नौदल वायू स्थानकांवर नेव्हल डोर्निअर विमान आणि हेलिकॉप्टर्स, पूरात अडकलेल्या बोटींच्या टीमला तसेच वादळात अडकलेल्या जवानांना अगदी कमी कालावधीच्या सूचनेत ही वाचविण्यासाठी सज्ज आहेत. संबंधित क्षेत्र आणि स्टेशन कमांडर्स राज्य प्रशासन, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या सतत संपर्कात आहेत जेणेकरून कमीतकमी वेळेत संकटाच्या परिस्थितीला प्रतिसाद देता येईल.

निसर्ग चक्रीवादळ अरबी समुद्रात घोंघावत असल्याने सर्व पथके सतर्क झाली आहेत आणि वादळाच्या काळात लोकांना मदत व आपत्ती निवारणा (एचएडीआर) च्या कोणत्याही आवश्यकतेला प्रतिसाद देण्याची तयारी दर्शविली आहे.