निसर्गोपचार शिबिराविषयीच्या माहिती वाहनाला हिरवा झेंडा

0
532

30 सप्टेंबरपासून तीन दिवसीय निसर्गोपचार शिबिराचे आयोजन

गोवा खबर:माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो आणि राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 30 तारखेपासून तीन दिवसीय निसर्गोपचार शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. महात्मा गांधीजींच्या 150 व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित शिबिरात निसर्गोपचाराविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिराच्या प्रसार आणि प्रचारासाठीच्या माहिती वाहनाला आज हिरवी झेंडा दाखवण्यात आला. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे पश्चिम विभागाचे महासंचालक आर.एन. मिश्रा, निसर्गोपचार संस्थेच्या संचालक डॉ के सत्य लक्ष्मी, केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सह सचिव पी.एन. रणजीतकुमार यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांना विविध व्याधींना सामोरे जावे लागत आहे. त्यादृष्टीने महात्मा गांधींनी भर दिलेली निसर्गोपचार पद्धती लोकांसमोर यावी, हा या प्रदर्शन आणि शिबिराचा उद्देश असल्याचे आर.एन. मिश्रा म्हणाले.निसर्गोपचार शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पी.एन.रणजीतकुमार यांनी केले.

30 सप्टेंबर रोजी राज्यपाल श्रीमती मृदूला सिन्हा यांच्या हस्ते या निसर्गोपचार शिबिराचे उदघाटन होणार आहे.