निवृत्त दर्यावर्दींचा पेन्शन योजनेचा प्रश्न सोडविण्याचे मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन

0
241

            

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांनी निवृत्त दर्यावर्दी व त्यांच्या विधवाना देण्यात येणा-या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे आश्वासन गोमंतकीय दर्यावर्दी संघटनेच्या सदस्यांना दिले. गोमंतकीय भारतीय दर्यावर्दी संघटनेच्या प्रतिनिधीनी आज मुख्यमंत्री श्री सावंत यांच्याकडे सदर योजना पुन्हा सुरू करण्यासाठीचे निवेदन सादर केले.

 गोवा कल्याण पेन्शन योजनेखाली निवृत्त दर्यावर्दी व त्यांच्या विधवाना गेल्या ५ वर्षापासून आर्थिक मदत देण्यात येते ही य़ोजना लाभधारकांना न कळविताच बंद करण्यात आली त्यामुळे त्याना अडचण निर्माण झाली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रतिनिधीनी मांडलेल्या समस्या बारकाईने जाणून घेतल्या आणि त्यांची ही समस्या लवकरच सोडविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

गोमंतकीय भारतीय दर्यावर्दी संघटनेचे अध्यक्ष श्री फ्रॅंक व्हियेगस आणि इतर सदस्य बैठकीस उपस्थित होते.