निवडून आल्यानंतर पणजीत राहणार:गिरीश

0
1036

पणजी मधील मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवून मोठी जबाबदारी सोपवण्याची तयारी सुरु केली आहे.मतदारांची मागणी लक्षात घेऊन मी पणजी मध्ये महालक्ष्मी मंदिरा जवळ रहायचे ठरवले आहे.पणजी वासियांच्या सेवेसाठी सदैव तयार राहण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे गिरीश चोडणकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
चोडणकर म्हणाले, मी निवडून आल्यानंतर पणजी मध्ये रहायला हवे असे पणजीवासियांचे म्हणणे आहे.मला ते मान्य आहे.पणजीत मुक्काम करण्या बरोबर पणजी आणि रायबंदर येथे कार्यालय सुरु करून जनतेसाठी कायम उपस्थित राहणार असल्याचे चोडणकर यांनी सांगितले.