निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दारू वाहतूकीवर/जवळ बाळगण्यावर निर्बंध

0
740

गोवा खबर:कर्नाटक राज्यातील लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे १६ एप्रिल २०१९ रोजी संध्या. ६.०० वा. पासून ते १८ एप्रिल २०१९ रोजी संध्या. ६.०० वा. पर्यंत आणि  २१ एप्रिल २०१९ रोजी संध्या. ६.०० वा. पासून ते २३ एप्रिल २०१९ रोजी संध्या. ६.०० वा. पर्यंत आणि २३ मे २०१९ रोजी मतमोजणीच्या दिवशी कर्नाटक राज्यातील बेळगांव व कारवार जिल्ह्याच्या सीमेपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या काणकोण तालुक्यातील पोळे गाव व सत्तरी तालुक्यातील सुर्ला गावच्या परिसरात कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कुटुंबासहित बीअर व्यतिरिक्त देशी बनावटीच्या विदेशी दारूची किंवा विदेशी दारूची, तसेच  देशी दारूची पाऊण बाटली आणि बीअरच्या ६५० मि.ली. च्या ६ बाटल्या अशा कमाल मर्यादेत दारूची वाहतूक करता येईल.

दारू वाहतूकीवर/जवळ बाळगण्यावर निर्बंध

गोवा राज्यातील लोकसभा निवडणूक २०१९ व पोटवनवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे दारू वाहतूकीवर/जवळ बाळगण्यावर निर्बंध लागू केले आहेत. गोवा राज्यात २१ एप्रिल २०१९ रोजी संध्या. ६.०० वा. पासून ते २३ एप्रिल २०१९ रोजी संध्या. ६.०० वा. पर्यंत आणि २३ मे २०१९ रोजी मतमोजणीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कुटुंबासहित बीअरव्यतिरिक्त देशी बनावटीच्या विदेशी दारूची किंवा विदेशी दारूची, तसेच देशी दारूची पाऊण बाटली आणि बीअरच्या ६५० मि.ली. च्या ६ बाटल्या, अशा कमाल मर्यादेत परमटशिवाय दारूची वाहतूक करता येईल किंवा जवळ बाळगता येईल.