निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा आज फूंकणार रणशिंग

0
1019
30 हजारहुन अधिक कार्यकर्ते राहणार उपस्थित
गोवा खबर:आगामी लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज रणशिंग फूंकणार आहेत.   भाजपने निवडणूकांची जय्यत तयारी सुरू केली असून त्याचाच भाग म्हणून आज  9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता कुजिरा-बांबोळी येथील सागच्या ऍथेलेटीक स्टेडियममध्ये भाजप बुथ कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा त्या संमेलनात मार्गदर्शन करणार आहेत.राज्यभरातून सुमारे 30,000 बुथ कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
भाजपचे गोवा प्रदेश अध्यक्ष व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी पणजीत  पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.
भाजप कार्यकर्त्यांतर्फे समर्पण दिवस, मेरा परिवार भाजप परिवार हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. 12 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत हे उपक्रम होणार असून 2 मार्च रोजी भाजप कार्यकर्ते सर्व 40 मतदारसंघातून एकाच वेळी बाइक रॅली काढण्यात येणार आहे.
भाजपच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांच्या घरी ‘कमल जोती उत्सव’ 26 फेब्रुवारीला साजरा करतील. त्याशिवाय समर्पण दिनाच्या निमित्ताने भाजपचे कार्यकर्ते पक्षासाठी  निधी अर्पण करणार आहेत, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.
गोव्यातील खाणबंदीच्या विषयाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. ते लवकरच या प्रश्नावर तोडगा काढतील अशी आशा तेंडुलकर यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणूक तसेच दोन पोटनिवडणुकीत भाजपचाच विजय होईल अशी खात्री देखील त्यांनी वर्तवली.