निवडणूकपूर्व तयारीच्या दृष्टीने सर्व व्हिव्हिपॅट निर्धारित वेळेत पोहोचावेत : निवडणूक आयोग

0
1029

गोवा खबर:2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्व ठिकाणी व्हिव्हिपॅट योग्य वेळेत पोहोचावेत असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आयोगाच्या आदेशानुसार बंगळुरु येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि हैद्राबाद येथील इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडून, मे 2017 पर्यंत 16.15 लाख व्हिव्हिपॅटचे उत्पादन अपेक्षित होते. मात्र आत्तापर्यंत 5.88 लाख एककांचे उत्पादन पूर्ण झाले असून मागणीच्या तुलनेत हे प्रमाण 36 टक्के इतके आहे.