नाविकांना सूचना                              

0
609

गोवा खबर:ज्यांनी स्वतःच्या जोखमीवर आणि जबाबदारीवर त्यांच्या बार्जेस बाणस्तारी पुलाखालील कुंभारजुवे कालव्यातून पुढे नेण्यासाठी अर्ज केला आहे त्यांना काम पूर्ण होईपर्यंत तसे करण्यासाठी विशेष परवानगी देण्यात आली आहे.

भरलेल्या बार्जेस मांडवी नदीकडे जाण्यासाठी झुवारी नदीतून भरतीच्या किमान एक तास अगोदर तरी कुंभारजुवे कालव्यात शिरल्या पाहिजेत. भरती ओहोटीच्या योग्यवेळा सांभाळून रिकाम्या बार्जेसनी मांडवी नदीतून कुंभारजुवे कालव्यात शिरले पाहिजे. भरलेल्या बार्जेसनी वाहतूक करण्यासाठी भरती ओहोटीच्या वेळा सुनिश्चित करून झुवारीतून मडकईच्या बाजूने गेले पाहिजे.

डोक्यावरील उच्च दाबाच्या वाहिनीशी संपर्क टाळण्यासाठी पुढील खांब दुमडला आहे किंवा खाली केला आहे याची खातरजमा करणे आवश्यक आहे. मार्गावरील नियमांचे प्रत्येकवेळी पालन केले पाहिजे.