नाल्ले – केरी येथील पायवाटेच्या बांधकामाचा आयुषमंत्री श्रीपाद नाईकांच्या हस्ते शिलान्यास

0
621

 

गोवा खबर:नाल्ले-केशरी येथील पायवाटेने बांधकामाचा आयष मंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज गोव्याचे कला व सांस्कृतिक मंत्री तथा प्रियोळचे आमदार श्री. गोविंद गावडे यांच्या उपस्थितीत शीलान्यास बसविण्यात आला.

केरी प्रियोळ येथील पायवाटेच्या बांधकामाला याआधीच मंजुरी मिळाली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे काम सुरू होण्यास उशीर लागला. इथे लहान अपघात होत असल्याचे स्थानिक आमदारांनी आपल्या लक्षात आणून दिले, त्यामुळे तातडीने या कामाला आता सुरवात करण्यात येत आहे. या कामासाठी अंदाजे 16.51 लाख खर्च अपेक्षित असला तरी या पायवाटेच्या कामासाठी 14.70 लाखाची निविदा जारी करण्यात आली आहे. हे काम 210 दिवसात पूर्ण होण्याची कंत्राटदाराला अट असली त्याआधीच हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा केंद्रीय आयुष मंत्री तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली.

फोंडा तालुक्यातील नाल्ले – केरी येथील पायवाटेचे बांधकाम केंद्र सरकारच्या “संसद आदर्श ग्राम योजने ” अंतर्गत श्री.श्रीपाद नाईक यांनी मंजूर केले आहे. नाईक यांच्या हस्ते शनिवारी या बांधकामाची कोनशिला बसविण्यात आली.
यावेळी नाईक म्हणाले, की खासदार निधीतून आपण राज्यात अनेक विकासकामे केली आहेत. मात्र कोरोणामुळे या निधीच्या वापरवर दोन वर्षे बंदी घालण्यात आली आहे. सदर बंदीला एक वर्ष पूर्ण झाले असून आणखी एक वर्ष बाकी आहे. तरीही राज्य सरकारच्या मदतीने राज्यातील विकासकामे सुरू राहणार आहेत.

कला व संस्कृती मंत्री तथा प्रियोळचे आमदार श्री.गोविंद गावडे म्हणाले, की केरी भागात अनेक विकास कामे झाली आहेत. आणखी काही विकास कामाच्या निविदाही काढण्यात आल्या असून हे काम पूर्ण झाल्यावर मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहे. ही विकास कामे पूर्ण करण्यास अनेक पंचायत सदस्य, कार्यकर्त्यांचे आणि सहकाऱ्यांचे आशीर्वाद आणि सहकार्य लाभले आहे.