नारी शक्ती पुरस्कार 2018 साठी नामांकने मागवली

0
1479

 

गोवा खबर:भारतीय महिलांसाठीच्या सर्वोच्च ‘नारी शक्ती पुरस्कार 2018’ साठी महिला आणि बालविकास मंत्रालयाने नामांकने मागवली आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या महिला आणि संस्थांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.

दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजे 8 मार्चला राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो. पुरस्काराचे यंदाचे 19 वे वर्ष आहे. महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला आणि संस्थांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

31 ऑक्टोबर 2018 पर्यंत या पुरस्कारासाठी नामांकने पाठवता येतील. नामांकनाचा पत्ता- उपसचिव, महिला आणि बालकल्याण विभाग, रुम नं. 632, सहावा माळा, शास्त्री भवन, नवी दिल्ली -01 येथे आवश्यक कागदपत्रांसह नामांकने सादर करावी लागतील. पुरस्कारासाठीच्या मार्गदर्शक सूचना http://www.wcd.nic.in/award येथे वाचता येतील. विजेत्यांची अंतिम निवड राष्ट्रीय निवड समितीतर्फे केली जाणार आहे.