नायकाच्या सिग्नेचर ‘ब्युटी बार’चे गोव्यात उद्घाटन

0
787
गोवा खबर:भारतातील आघाडीचा ब्युटी रिटेलर ब्रँड असलेल्या नायकाने मंगळवारी, २५ फेब्रुवारी रोजी गोव्यामध्ये आपल्या सिग्नेचर ब्युटी बारचे उद्घाटन केले. यामुळे आता ग्राहकांना हुडा ब्युटी, टँगल टीझर, नायका नॅचरल्स आणि नायका कॉस्मेटिक्स असे भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय मेक-अप् आणि स्कीनकेअर ब्रँडद्वारे वैयक्तिक सौंदर्यसेवा अनुभव मिळणार आहे.
सिटी सेंटर मॉलमध्ये नायका लक्स स्टोअरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोव्यातील हे दालन १०७ चौरस फूट क्षेत्रफळावर विस्तारले असून या दालनात इस्टी लावडर, बॉबी ब्राऊन, क्लिनिक, एम.ए.सी, नायका कॉस्मेटिक्स, के ब्युटी असे विविध ब्रँड सादर करण्यात आले आहेत. तसेच भारतात नुकताच सादर झालेला जगप्रसिद्ध हेअरब्रश ब्रँड टँगल टीझरही नायकाच्या या दालनात उपलब्ध करण्यात आला आहे. पणजीतील ताज विवांता हॉटेलमध्ये आयोजित ब्युटी बार उपक्रम म्हणजे मेकअपचे नवे ट्रेंड आणि लुक परिधान करू पाहू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी पर्वणी ठरला. सर्वांनाच हवाहवासा वाटणारा नायका अनुभव देण्याबरोबरच या ब्युटी बारमध्ये विविध प्रकारचे मेक-अप, स्किनकेअर आणि लोकप्रिय नेल कलरचे कलेक्शन सादर करण्यात आले. तसेच योग्य लुकबाबत ग्राहकांना या ब्युटी बारमध्ये विविध टिप्स आणि ट्रिक्सची माहिती देण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित निकाडॉटकॉमच्या मुख्य बिझनेस कंटेन्ट माधवी इराणी म्हणाल्या, “गोव्यात आमचे पहिले दालन सुरू करताना आम्ही खूप उत्सुक आहोत. भारतातील सौंदर्य प्रसाधन क्षेत्राला नवा आकार देण्यात निकाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. सर्वोत्तम ब्युटी ब्रँड, उत्पादनांच्या माध्यमातून ग्राहकांना सौंदर्यानुभव देण्यासाठी, माहितीपूर्ण अशी सौंदर्य माहिती उपलब्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आता आमच्या ओम्नी-चॅनेल उपस्थितीमुळे ग्राहकांना सहजपणे एकमेकांशी संवाद साधणे सुलभ झाले आहे.”
वेबसाइट आणि अॅपच्या माध्यमातून मेकअप, स्किनकेअर, हेअरकेअर आणि वेलनस सेवांबाबत एक-खिडकी, वैयक्तिक सेवा देण्यासाठी भारतभर निकाची १५००हून अधिक ब्रँड कार्यरत आहेत. ओम्नी-चॅनेलच्या माध्यमातून रिटेलर तसेच निका लक्स आणि निका ऑन ट्रेंड या दोन प्रकारात देशभर ६८ दालनांचे जाळे विस्तारलेले आहे. निका हमीसेवेच्या माध्यमातून थेट ब्रँड आणि अधीकृत वितरकांच्या माध्यमातून १०० टक्के खरीखुरी उत्पादने ग्राहकांपर्यंत पोचवली जातात.
निका ब्युटी या निकाच्या इनहाऊस ब्युटी उत्पादन श्रेणीमध्ये स्कीन सिक्रेट्स शीट मास्क, वँडरलस्ट बाथ, बॉडी कलेक्शन, नॅचरल्स आणि फान फ्रॅगरन्समध्ये ओठ, डोळे, चेहरा, नखे, त्वचा आणि शरीर सुरक्षा व सौंदर्य उत्पादने उपलब्ध आहेत. फॅशन क्षेत्रात प्रवेश करताना २०१८ साली निकाद्वारे निका फॅशन सादर करण्यात आला. याद्वारे ४५०हून अधिक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय ब्रँड हायस्ट्रीट, डिझायनर लेबल आणि असेसरीजमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. निकाने खास पुरुषांसाठी निका मॅन वेबसाइट आणि अॅपच्या माध्यमातून सौंदर्य उत्पादने सेवा उपलब्ध केली आहे.
सौंदर्य सल्ला-मार्गदर्शनासाठी निकाने सौंदर्यप्रेमींसाठी निका नेटवर्क ही ऑनलाइन कम्युनिटी सेवा सुरू केली आहे. तसेच निका प्रो प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारच्या व्यावसायिक सौंदर्य गरजांसाठी विशेष सुविधा व योजनाही उपलब्ध करण्यात येतात.