नाफ्ता जहाज संकटाची पंतप्रधानांनी दखल घ्यावी;काँग्रेसची पत्राद्वारे मागणी

0
770
गोवा खबर:गोवा प्रदेश काॅंग्रेस समिती अध्यक्ष गिरीश चोडणकर यानी गोव्याच्या मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या हद्दीत पाकीस्तानातुन आलेल्या भरकटलेल्या बेवारशी जहाजामुळे राष्ट्रीय सुरक्षे बरोबरच  गोव्याच्या पर्यावरण व पर्यटनाला संपवुन टाकण्याचे संकट उभे झाले असल्याची भीती व्यक्त केली आहे. राष्ट्रीय आपत्कालीन सुरक्षा दल, राष्ट्रीय तपास यंत्रणा व डिफेंस इंटेलिजंस एजेंसी यांच्याकडे त्वरीत हे प्रकरण सोपवीण्याची मागणी चोडणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवुन केली आहे. 
नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यानी समुद्रमार्गेच प्रवेश केला होता हे  चोडणकर यांनी पत्रातुन पंतप्रधानांच्या लक्षात आणुन दिले आहे.तसेच त्याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यानी या विषयावर गंभीरपणे लक्ष देण्याचे सोडुन, वारंवार आपली भुमिका बदलण्याचे सत्र अवलंबत असल्याचे  चोडणकर यानी आपल्या पत्रात नमुद केले आहे. त्यामुळे गोमंतकीयांच्या मनात भय निर्माण झाले म्हटले असून गोवा सरकार सदर जहाजातील ज्वलनशील पदार्थ बाहेर काढण्यास मागील पंधरा दिवस पुर्णपणे अपयशी ठरल्याचे आरोप चोडणकर यांनी केला आहे.
नू शी नलिनी जहाजापासुन दोनापावल येथिल गोवा राजभवन, राजधानी पणजी शहर तसेच मुरगाव बंदर व दाबोळी आतंराष्ट्रीय विमानतळ अवघ्या काही अतंरावर असल्याचे सांगुन, सदर जहाजात असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे स्फोटासारखी मोठी दुर्घटना घडल्यास मोठी जीवीतहानी होऊ शकते तसेच राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका पोहचु शकतो असे पत्रात म्हटले आहे.
मुरगाव पोर्ट ट्रस्टने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असुन, सदर जहाजाला तडे गेल्यास महाभंयकर संकट उभे ठाकणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रतिज्ञापत्रामुळे भोपाळ वायु दुर्घटनेसारखी परिस्थीती गोव्यात उद्भवु शकते असे त्यानी पंतप्रधानांच्या नजरेस आणुन दिले आहे.
सदर जहाज बेकायदेशीरपणे आणण्यास गोवा मंत्रीमंडळातील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप करत  त्यामुळेच मुख्यमंत्री केवळ राजकीय कारणांसाठी या भयानक संकटाकडे दुर्लक्ष करुन, सदर प्रकरणांत अडकलेल्यांच्या कृत्यांवर पांघरुण घालण्याच्या प्रयत्न करीत आहेत असे चोडणकर यानी पुढे म्हटले आहे.