नागरी पुरवठा खात्यातर्फे हरभरा वाटप

0
136

गोवा खबर:नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खात्यातर्फे एनएफएसए शिधापत्रिकाधारकांना, म्हणजे प्राधान्यक्रम कुटुंबे, अंत्योदय अन्न योजना यांना प्रधानमंत्री ग्राम कल्याण अन्न योजनेंतर्गत, ऑक्टोबर २०२० महिन्याच्या कोट्यातून, सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत नियमित अन्नधान्याच्या कोट्यासोबत हरभरा वाटप करत आहे.

 प्राधान्यक्रम कुटुंबे, अंत्योदय अन्न योजना कार्डधारकांना प्रति कार्ड १ किलो हरभरा मोफत देण्यात येतील.

सर्व स्वस्त धान्य दुकान मालकांना कळविण्यात येते की, कोट्याची उचल त्वरित सुरू होईल. सर्व प्राधान्यक्रम कुटुंबे, अंत्योदय अन्न योजना कार्डधारकांनी प्रधानमंत्री ग्राम कल्याण अन्न योजनेंतर्गतचा आपला ऑक्टोबर २०२० महिन्याचा कोटा, जो प्रति कार्ड १ किलो हरभरे आहे, आपल्या संबंधित स्वस्त धान्य दुकानांमधून २१ नोव्हेंबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे, असे माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.