नव्या रूपातील सीएमएम एरिनाचे उद्घाटन

0
1102

 

 

 

गोवा खबर:गोव्यातील सर्वांत मोठा होम आणि ऑफिस रिटेलर असलेल्या, मेरशी स्थित सीएमएम एरिनाने नूतनीकृत सीएमएम एरिनाचे उद्घाटन केले. सीएमएम ग्रुप ऑफ कंपनीजचे ज्येष्ठ संचालक श्री. डेल मिनेझिस आणि सीएमएम एरिना रिटेल्स प्रा. लि.चे सरव्यवस्थापक-रिटेल श्री. हरी कौल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ साजरा झाला.

समूहाच्या ८ शोरूममध्ये सीएमएम एरिना ही प्रमुख व सर्वांत मोठी शोरूम आहे. मेरशी स्थित ही शोरूम ३३,००० चौरस फूट क्षेत्रावर विस्तारलेली आहे. सीएमएम ग्रुप ऑफ कंपनीज हा गोव्यातील सर्वांत जुन्या व विश्वसनीय व्यावसायिक समूहांपैकी एक गणला जातो आणि सीएमएम एरिना रिटेल्स प्रा. लि. ही कंपनी या समूहाचा भाग आहे. १९१० साली स्थापित झालेल्या या समूहामध्ये विविध वैद्यकीय उपकरणे, कंझ्युमर प्लास्टर्स, लॉजिस्टिक्स, वितरण आणि रिटेल अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांचा समावेश होतो.

 

याप्रसंगी सीएमएम ग्रुप ऑफ कंपनीचे ज्येष्ठ संचालक श्री. डेल मिनेझिस म्हणाले, “ग्राहकांच्या अधिकाधिक जवळ पोचणे आणि गोव्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ब्रँडप्रमाणे शॉपिंगचा आनंद व अनुभव देणे ही बाब आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. शतकभराची श्रीमंत परंपरा लाभलेल्या आमच्या ब्रँडला संपूर्ण गोव्यातून पसंती मिळत आली आहे. या शोरूममध्ये आम्ही नेहमीच काहीतरी नवे सादर करण्याचा प्रयत्नात असतो आणि आता भव्य, सुलभ, आनंददायी आणि परवडणारा शॉपिंग अनुभव एकाच छताखाली ग्राहकांना मिळणार आहे. पूर्णतः वातानुकूलित अशा या शोरूममध्ये लिफ्टचीही सुविधा असल्याने ज्येष्ठ नागरिक व शारिरीकदृष्ट्या विशेष लोकांनांही शोरूमच्या सर्व विभागांमध्ये सहजपणे फिरता येते. सीएमएम एरिनापासून सर्वच पिढीतील ग्राहकांना आपल्या घराची रचना कशा प्रकारे करावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून यापुढे ओळखले जाईल. एकूणच विविध घटकांशी संबंध वाढवणे आणि श्रीमंत उत्पादने-सेवांच्या अभिमानाला नव्या उंचीवर नेणे याबाबत आम्ही सातत्याने प्रयत्न करत आलो आहोत.”

 

सीएमएम एरिना रिटेल्स प्रा. लि.चे सरव्यवस्थापक-रिटेल श्री. हरी कौल म्हणाले, “गत ७ वर्षांतील आमच्या प्रवासामध्ये ग्राहकराजा हा नेहमीच आमचा आधार आणि मार्गदर्शक राहिला आहे, या स्पर्धात्मक जगामध्ये अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी प्रोत्साहन देत आला आहे. विशेष, वेगळ्या, दर्जेदार, कलात्मक आणि आपल्या गरजांना उपयुक्त तसेच टिकाऊ, विश्वसनीय, कार्यक्षम अशी उत्पादने आणि सेवा मिळण्याची ग्राहकांची अपेक्षा असते. आपल्या गरजा, आपली दरश्रेणी यानुरूप योग्य उत्पादन निवडण्यासाठी ग्राहकांनी आमच्या शोरूमला भेट द्यावी. प्रत्यक्ष शोरूम भेटीदरम्यान ग्राहक विविध ऑफरचा लाभ घेण्याची संधी घेऊ शकतात.”

ग्राहकांना आनंददायी, सुलभ व सहज शॉपिंगचा अनुभव लुटता यावा या हेतूने सीएमएम एरिनाचे नूतनीकरण करण्यात आले आहे, तसेच योग्य मार्गदर्शन व सेवा देणारी सेल्थ व सर्व्हिस टीमही ग्राहकांच्या सेवेसाठी या शोरूममध्ये सज्ज आहे. या नव्याने सजलेल्या शोरूममध्ये लायटिंग, वॉक-इन वारड्रोब, नवनवे फर्निचर डिझाईन, मोड्युलर किचन उत्पादनांची नवी श्रेणी, होम डेकॉर उत्पादने तसेच वारड्रोब आणि बेडचे नवे ब्रँड ग्राहकांच्या सेवेला सज्ज आहेत.

 

रचनेतील वेगळेपणा आणि सर्व स्तरातील ग्राहकांची समावेशकता साधत सीएमएम एरिनाने आपले घर वा कार्यालय आकर्षकपणे सजवता यावे यासाठी उत्पादनांबाबत मार्गदर्शन, सहज शॉपिंग आणि प्रामाणिक व तत्पर विक्रीपश्चात सेवा सादर केली आहे.

 

नूतनीकृत सीएमएम एरिना शोरूममध्ये फर्निचर आणि लाइफस्टाइल उत्पादनांबाबत पारंपरिक तसेच नव्या ट्रेंडमधील पॉप डिस्प्ले, मॉक-अप् डिस्प्ले आहेत. या उद्य़ोग समूहाची अधिक माहिती घेण्यासाठी तसेच आगामी गणेशोत्सवापासून येणाऱ्या विविध सण-समारंभांचे स्वागत करण्यासाठी उपलब्ध उत्पादने व या उत्पादनांवरील ऑफर पाहण्यासाठी www.cmmarena.com या वेबसाइटला भेट द्या किंवा १८०० ३००० ९५२७ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा ऑनलाइन नोंदणीसाठी संपर्क साधा.